गडचिरोली/प्रतिनिधी:
गोल्ला उर्फ गोलकर समाज संघटना चंद्रपूर व गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ११ मे रोजी स्थानिक महिला व बाल रूग्णालयात सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता मान्यवरांचे आगमन झाले. ९ वाजता नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आले. ९.१५ वाजता रक्तदान शिबिराला सुरूवात झाली दुपारी १२.३० वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. गोल्ला उर्फ गोलकर समाजाच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी गडचिरोली येथे रक्ताचा तुटवडा लक्षात घेता गडचिरोलीत शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले . गोल्ला उर्फ गोलकर समाज समाज बांधवांनी लोकां समोर रक्तदान करून आदर्श निर्माण केले. चंद्रपूर आणि गडचिरोली चे खूप संख्येने लोक रक्तदान केले . 100 समाज बांधवांची तपासणी करण्यात आली. त्यामधून 30 रक्तदातानी रक्तदान केले आणि रक्तदान केलेले रक्तदातांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. बहुसंख्येने गोल्ला उर्फ गोलकर समाज बांधवांनी उपस्थित होते.