नागपूर/ललित लांजेवार:
राजुरा अत्याचार प्रकरण ताजे असतानाच धोटे कुटुंबियांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत.
तक्रारदार विद्यार्थिनी ही कल्याण इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे दोन वर्षांपासून शिकत असताना तिला तेथील प्राचार्य गुरूराज कुलकर्णी यांच्याकडून अश्लील बोलभाषेत तिचा छळ करण्यात आला होता, या प्रकरणाची तक्रार सुभाष धोटे यांना पिडीतेने वारंवार दिली होती तरीही त्यांनी कायम दुर्लक्ष कर्यात आले असा आरोप विद्यार्थिनीचा आहे.
राजुरा वसतिगृह येथील लैंगिक शोषण प्रकरण आणि आदिवासी मुलींबद्दल केलेल्या असभ्य वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सुभाष धोटे वादात अडकले आहेत. संबंधित विद्यार्थिनीवर जबरदस्तीचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात विद्यार्थिनीने दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी देखील दबाव टाकण्यात आला होता. तसेच पीडिताला व भावाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, अशी तक्रार संबंधित विद्यार्थिनीने दिली होती. या प्रकरणानंतर सुभाष धोटे यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. याआधी राजुरा येथील शाळेत आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात असंवेदनशील वक्तव्य केल्याने सुभाष धोटेंवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात ते जामीनावर आहेत.
याप्रकरणी काल गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना आज अटक केली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सुभाष आणि अरुण धोटे यांना बल्लारपूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणात शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्य व इतर लोकांविरुद्ध तक्रार दिली असता पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांनी तात्काळ दखल घेत ६ आरोपीविरुद्ध भादंवि 354,354(अ ),354(ड )504,506,34अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोल्ट्रीफीड |