Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २१, २०१९

इको-प्रो ची महाराष्ट्र वारसा संवर्धन परिक्रमा करून परतली


मोटरसायकलच्या मध्यमाने विविध शहरात जनजागृति
चंद्रपूर - महाराष्ट्रातील ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने इको-प्रो च्या वतीने वतीने एक मे 2019 रोजी परिक्रमेला सुरुवात झाली. ही परिक्रमा 20 दिवसांचा अखंड प्रवास करून चंद्रपुरात परत दाखल झाली आहे.

ही परिक्रमा 1 मे रोजी चंद्रपूर येथील पठाणपुरा गेट इथून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर प्रवासाला रवाना झाली या मार्गात मुल गडचिरोली येथून आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे ही परिक्रमा पोहोचली. वैरागड़ ग्रामपंचायत आणि पुरातत्त्व विभागाच्या वतीने येथे स्वागत करण्यात आले असलेल्या प्राचीन वैरागड किल्ल्याला भेट देण्यात आली गावकर्‍यांशी चर्चा केल्यानंतर हा किल्ला स्वच्छ व समृद्ध करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले सध्या येथे डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. या भागातील गावकरी यांनी एफडीसीएम च्या मध्यमाने सुरु असलेली जंगल तोड़ विषयी नाराजी व्यक्त करीत या कामास विरोध केलेला आहे. त्यानंतर ही परिक्रमा गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल आणि हिरव्यागार वनराईतून मार्गाक्रमण करत नवेगाव बांध च्या दिशेने रवाना झाली. येथे सायंकाळी वन अधिकारी व कर्मचारी आणि गावकरी यांच्याशी संवाद साधण्यात आला जंगल ग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न यावेळी समजून घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी पवनी येथील ऐतिहासिक किल्ला, उमरेड येथील गोंडकालीन भिंतीची पाहणी करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी गोंडकालीन वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी या दृष्टीने इको प्रोच्या मार्गदर्शनात काम करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर नागपूर येथे वनराई च्या वतीने स्वागत आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपुर येथे "भारत वन" संरक्षण साठी सुरु असलेल्या लढा देणारे व्यक्ति आणि भारतवन ला भेट देऊन समर्थन देण्यात आले. यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा येथे परिक्रमा पोहोचली. जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथे नैसर्गिक वारसा सोबतच ऐतिहासिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. सध्या त्याकडे दुर्लक्ष होत असून, जतनासाठी उपाय योजना आखण्याची गरज असून स्थानिक युवक सुद्धा येथे सहकार्य करीत असल्याचे चांगले चित्र दिसून आले, अभयारण्य आणि ऐतिहासिक वास्तू स्वच्छतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. येथील कार्यकर्ते चांगलं काम करत आहे ते अधिक प्रभावी होईल याकरिता भविष्यात येथील संस्थांसोबत सहकार्य करण्यात येईल.


पुढे औरंगाबाद येथील कार्यक्रमात पर्यावरण आणि पुरातत्त्व संवर्धन संदर्भातील बऱ्याच संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि हा एक चांगला कार्यक्रम येथे स्थानिकांच्या मदतीने यशस्वी झाला. या संदर्भात औरंगाबाद क्षेत्रांमध्ये या दोन्ही वारसा संदर्भात काय करता येईल, या अनुषंगाने येथील सर्व कार्यकर्ते यापुढेही संपर्कात राहून या माध्यमाने सुरू असलेली चळवळ इतर नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग घेण्याकरिता पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.


वारसा जतन आणि संवर्धन परिक्रमा जळगाव जिल्ह्यात पोहोचल्यानंतर चाळीसगावचे कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांनी सांगितले की पारोळा या गावी असलेल्या भुइकोट किल्ला आहे. तो झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे गांव आहे. या ठिकाणी भेट दिल्यानंतर माहिती मिळाली की हा किल्ला दुरावस्था उपेक्षित आहे. झाड़ी झुडपे अस्वच्छता यामुळे वाताहत झालेली आहे. या अनुषंगाने स्थानिक लोकांशी संपर्क साधत त्यांना चंद्रपूरच्या अभियानाविषयी माहिती सांगितली. चंद्रपूर स्थानिक नागरिकांनी पुढे कसा वारसा जपला, याचे चित्र फिल्म दाखविली. दुसर्‍या दिवसापासूनच या युवकांनी बैठक घेत इको आर्मी नावाचा ग्रुप तयार करत गेली बारा दिवस अजून्ही मी रोज सकाळी सहा ते नऊ या दरम्यान स्वच्छता कार्य सुरु आहे.


इथून पुढे नाशिक, ठाणे, मुंबई येथे दाखल झाल्यानंतर समुद्री मार्गाने कोकणात प्रवेश केला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील समुद्र किल्ल्याची पाहणी करण्यात आली. मुरुड जंजिरा या किल्ल्याची फार मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. या किल्ल्याच्या जतनासाठी ही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. पन्हाळा किल्ल्यावर येथे नगराध्यक्ष यांनी परिक्रमेचे स्वागत करीत छोटेखानी बैठक आयोजित केलि. येथे पदाधिकारी यांचे सोबत बैठकीतून पुरातत्व विभाग व पन्हाळा नगर पालिका कसे पर्यटन विकास आणि किल्ले संवर्धन कार्य करू शकते यावर सकारात्मक चर्चा झाली. इथून पुढे कोकण मधे सिंधुदुर्ग रत्नागिरी मार्गे परिक्रमा गेली येथील जयगड पूर्णगढ़ भेट देत कोल्हापूर नगरीत दाखल झाली. त्या नंतर शिवाजी महाराजांच्या काळातील साळवन येथील काही स्थानिक लोकांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. त्यानंतर स्थानिक किल्ल्याची संवर्धन करण्याच्या दृष्टीने युवकांनी पुढाकार घेण्यासाठी पुढे आले. शिवाजी महाराजांना सिद्दी जोहर यांनी वेढा घातलेला पन्हाळा किल्ला येथे परिक्रमा दाखल झाल्यानंतर स्थानिक नगरपरिषदेच्यावतीने नगराध्यक्ष यानी स्वागत केले. या दरम्यान झालेल्या छोटेखानी बैठकीमध्ये चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाबद्दल माहिती चलचित्र फिल्म दाखवण्यात आली. या दरम्यान नगरपालिका आणि पुरातत्त्व विभाग यांच्या यांच्यात होणारा करार बाबत माहिती दिली. अशा पद्धतीने झाल्यास पर्यटकांच्या दृष्टीने ते विकासाची कामे करणे सहज शक्‍य होणार आहे, यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्याच्या संपर्कात राहून अशा पद्धतीने या गडाचे संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने चर्चा झाली.

पुणे येथील कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मंडळी सहभागी झालेली होती. या दरम्यान झालेल्या चर्चेनुसार या परिसरात सुद्धा अशा पद्धतीच्या कामाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या माध्यमाने पुण्यात सुरु असलेल्या वसुंधरा संस्थेच्या माध्यमाने डोंगरावरची वृक्षारोपण गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. डोंगर हिरवेगार करण्याच्या कामाला भेट दिली त्यांच्या कार्यकर्ते चे कार्य जाणून घेतले आणि या पद्धतीने जर नागरिक पुढे आले तरच हा सर्व पर्यावरण किंवा ऐतिहासिक वारसा संवर्धन असेल ते शक्य आहे.


त्यानंतर नांदेड येथील कार्यक्रमात वन विभागाच्या पुढाकाराने त्या ठिकाणी या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. या ठिकाणी पर्यावरण वन्यजीव आणि ऐतिहासिक वारसा या दोन्ही अनुषंगाने झालेल्या बैठकीत बऱ्याच लोकांनी आपल्या कंधार किल्ला बद्दल चिंता व्यक्त केली. तेथील नदीमध्ये इकोर्नीया वनस्पती वाढली आहे. त्या संपूर्ण ठिकाणी लोक अभियानाची गरज असल्याचे स्पष्ट झालं आणि त्यातून प्रेरणा घेऊन लोकसहभागातून ही सर्व कामे करता येणे शक्य आहे ही बाब स्पष्ट झाली. त्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केली. त्यानंतर परिक्रमा मराठवाड्यामध्ये आली आणि मराठवाडा मधील दुष्काळ बघितला. याविषयी ठिकाणी चारा छावण्या होत्या. त्या चारा छावण्यांना भेट देऊन स्थानिकांशी चर्चा करून या संदर्भातली माहिती जाणून घेतली. सर्व मंडळींना पर्यावरणाचा ऱ्हास, निसर्गाचा असमतोल म्हणजेच अशा पद्धतीचे दुष्काळासाठी कारणीभूत असतात, हे पटवून दिले. पाणी वाचवा पाणी जिरवा या अनुषंगाने अश्या पद्धतीचे काम गरज आहे किंवा वृक्षारोपणाची काय गरज आहे याचे महत्व त्यांना समजले.

वाशीम येथील वसल्लम या संस्थेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं होतं वाशिम हे मंदिराचे शहर आहे या ठिकाणी बरेच प्राचीन मंदिर आहे त्याला आहे या ठिकाणी पूर्वी वसले काळात बांधलेल्या होत्या पण त्याचं संपूर्णपणे नष्ट झालेले आहे परंतु आहे त्या संवर्धन करण्याकरिता आता युवक पुढाकार घेतील असं आश्वासन येथील कार्यकर्त्यांनी दिले सोबतच त्या ठिकाणी असणारा तलावाची एका महिन्यात गार काढून 'मी वाशिमकर' या ग्रुपच्या माध्यमाने त्या कामाला सरसावले आहेत

वाशिम नंतरही परिक्रमा यवतमाळ येथे पोहोचली. यवतमाळमध्ये कोब्रा अडवेंचर क्लब व प्रतिसाद संस्थाच्या माध्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संस्थेचे मंडळी विविध क्षेत्रात बरीच कामे करीत आहेत त्या माध्यमाने नदी तलाव संवर्धनासाठी काम करण्यात येईल, आपल्या वारसा जपण्याकरिता आपण पुढाकार घेऊ अशा पद्धतीचे एक मत व्यक्त झालं. यानंतर ही परिक्रमा वर्धा येथे पोहोचली वर्धा येथे बहार नेचर फाउंडेशन च्या माध्यमाने मगन संग्रहालय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. वर्धा येथील कार्यकर्त्यांनी निसर्ग व वास्तुवारसा जतन करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. सेवाग्राम हे देशासाठी आदर्श आणि प्रेरणास्थान आहे. ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे यासाठी ही पुढाकार घेण्यात येणार आहे. इको प्रोने आपल्या कार्यकाळात महात्मा गांधींचे तत्व पाळले आहे. सत्य अहिंसा आणि त्याग. पूज्य बापूंच्या बापू कुटीला भेट दिल्यानंतर या परिक्रमेचा समारोप कार्यक्रम करून परिक्रमा चंद्रपूरला स्वगृही परतली. चंद्रपूर येथे रात्री महिला मंडळ, पर्यावरण प्रेमी, इतिहासप्रेमींनी परिक्रमेत सहभागी सर्व कार्यकर्त्यांचे गुलाब पुष्प आणि पेढे भरवून स्वागत केले.

या संपूर्ण परिक्रमा दरम्यान जवळपास ३० जिल्ह्यातील कही निवडक संस्था, व्यक्तीसोबत संवाद साधता आला, या २० दिवसात जवळपास ४५०० किमी चा प्रवास महाराष्ट्रातील विविधतापूर्ण वातावरणात सदस्यांनी पूर्ण केला. कमी वेळ आणि प्रवास व् कार्यक्रम अधिक अशी परिक्रमा राहिली. महाराष्ट्रभर सकारात्मक प्रतिसाद आणि आदरतिथ्य, आमची जेवण निवास व्यवस्था स्थानिकानी करीता कुठेही अड़चन निर्माण होऊ दिली नाही, यानिमित्ताने विविध जिल्ह्यातील संस्था, व्यक्ति सोबत इको-प्रो आणि चंद्रपुर चे ऋणानुबंध जुडुन आले. या परिक्रमित २० वर्ष वयापासून तर ६५ वर्ष वयापर्यंत २५ सदस्य सहभागी झाले होते. यात बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात नितिन बुरडकर, रविंद्र गुरुनले, संजय सब्बनवार, अनिल अङ्गुरवार, धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा, राजू कहिलकार, सचिन धोत्रे, कपिल चौधरी, आकाश घोड़मारे, जीतेन्द्र वाल्के, संदीप जीवने, मनीष गावंडे, संदीप जेऊरकर, सुनील मिलाल, नितिन रामटेके, ललित मुल्लेवार, राजेश व्यास, चित्राक्ष धोतरे आदि सदस्य सहभागी झाले होते.


अहवाल सादर करणार या परिक्रमेच्या माध्यमातून राज्यातील जिल्हानिहाय नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा संवर्धन पुढील असलेली आव्हाने त्याकडे लक्ष वेधण्याकरिता उचित उपाययोजना व्हावी याकरिता त्या त्या जिल्ह्यातील अभ्यासक याचेकडून माहिती मिळवून आणि प्रत्यक्ष भेटीतिल अहवाल राज्य सरकार सादर करण्यात येणार आहे.


      राज्याचे स्पष्ट धोरण असावे            राज्यातील विविध क्षेत्रातील वन्यजीव विषयक समस्या सोडविण्यास आणि त्यादृष्टीने व्यापक कार्य होण्यास राज्याचे 'वन्यजीव विषयक स्वतंत्र धोरण' तयार करण्यात यावे तसेच राज्यातील ऐतिहासिक वारसा संवर्धन बाबत सुद्धा स्पष्ट असे धोरण अमलात आणावे अशी मागणी राज्य सरकार कड़े करण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.