Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे २१, २०१९

लार्जेस्ट लॉन्ड्री लेसनसाठी एरियल इंडियाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रमाणपत्र मिळाले




मुंबई, २१ मे, २०१९ : सन्स#शेअरदलोड (Sons#ShareTheLoad), हे एरियल इंडियाचे अलीकडचे कॅम्पेन असून याद्वारे कपडे धुण्याविषयी सर्वाधिक काळ धडे दिल्याबद्दल आज गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. आजच्या काळातील मुलांनी घरच्या कामात हातभार लावण्याविषयी जागृती या मोहिमेद्वारे करण्यात आली. जेणेकरून मुलांचे लग्न झाल्यावर त्यांना आयुष्याच्या जोडीदारासोबत घर चालविताना समान भूमिका निभावणे सोयीचे जाईल. 
या मोहिमेत लोकप्रिय अभिनेता, उत्तम नवरा आणि चांगला पिता म्हणून सुपरिचित असलेल्या अनिल कपूर यांनी सहभाग दर्शवला. त्यांनी समाजात आदर्श ठरावे असे उदाहरण तर उभे केलेच आहे, शिवाय तशी प्रेरणा स्पर्धकांमध्ये निर्माण करण्याचा उद्देश या सहभागामागे होता. यावर्षी एरियलने त्यांच्या #शेअरदलोड (#ShareTheLoad) चळवळीच्या तिसऱ्या आवृत्तीचा शुभारंभ केला, सध्याच्या पिढीने भावी पिढीतील मुलांना मुलींसारखी समान वागणूक द्यावी म्हणून आवाहन करण्यात आले. जेणेकरून आगामी पिढ्या अधिकाधिक समानता अंगीकारतील. या विचारला पाठबळ देत सेलेब मॉम मंदिरा बेदी यांनीही लार्जेस्ट लॉन्ड्री लेसन्समध्ये सहभाग घेतला. नवयुवकांमध्ये समानतेचे बी रुजावे आणि स्वत:च्या मुलाला #शेअरदलोड (#ShareTheLoad)चे महत्त्व पटवून देण्यासाठी तिने प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमाचे गांभीर्य ओळखून 400 मुले स्वेच्छेने पुढे आली आणि त्यांनी लॉन्ड्री काम शिकून घेतले, जो एक विक्रम ठरला. कारण घरकामाचे ओझे एरियल लॉन्ड्रीमुळे होते सहज-सोपे!

सन्स#शेअरदलोड (Sons#ShareTheLoad) या अभियानाची सुरुवात 24, जानेवारी 2019 रोजी झाली असून राष्ट्रीय स्तरावर 73MM व्यूज मिळवले आहेत! एरियल इंडियाला मोठा प्रतिसाद लाभला असून काही प्रतिथयश चेहरे आणि अष्टपैलू भागीदार आपले योगदान देण्याकरिता एकत्र आहेत. यामध्ये अभिनेता राजकुमार राव, पत्रलेखा, ज्वाला गुट्टा, रवी दुबे, सरगुन मेहता, सिद्धांत चतुर्वेदी, नेहा धुपिया, अंगद बेदी आणि जागतिक स्तरावरील नावे जसे की, फेसबुकच्या सीओओ शेरील सँडबर्ग, द हफिंगस्टन पोस्टच्या संस्थापिका एरिना हफिंगस्टन यांचा समावेश आहे. इतर ब्रँडमध्ये उपकरण क्षेत्रातील दिग्गज व्हर्लपूल, प्रकाशन क्षेत्रातील नामांकित असलेले नवनीत प्रकाशन, पीव्हीआर, हॅलो इंग्लिश लँग्वेज अॅप्लिकेशन, बिग बझार, मेट्रो कॅश आणि कॅरी हे सर्व घरगुती स्तरावर आढळणाऱ्या असमानतेसाठी एकवटले आहेत.


पी अँड जी इंडियाच्या मार्केटींग डायरेक्टर आणि फॅब्रिक केअर लीडर सोनाली धवन म्हणाल्या की, “#ShareTheLoad ने कायमच घरात आढळणारी असमानता दूर करण्यावर भर दिला आहे, प्रेक्षकांना विचार करायला लावणारे प्रश्न ते विचारतात, ज्यामुळे सहभाग वाढतो आणि सवय अंगात भिनते. सन्स#शेअरदलोड (Sons#ShareTheLoad), च्या माध्यमातून आम्ही युवा पिढीवर लक्ष केंद्रित केले, जर ही पिढी संतुलित प्रकारे मोठी झाली, तर समानता पाळणारी पिढी घडेल. याकरिता ही आमच्या पिढीतील पालकांची जबाबदारी आहे. आम्ही जबाबदारी उचलणारी सशक्त खांदे असणारी तरुणाई घडवली पाहिजे. याकरिता पद्धत मनोरंजक आणि गुंतवून ठेवणारी असावी. लार्जेस्ट लॉन्ड्री लेसनकरिता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने हे उद्याच्या समानतेच्या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल ठरले. जिथे पुढची पिढी घरगुती कामांत समानता पाळेल. परिवर्तनाचा चेहरा म्हणून एरियल काम करत राहणार आहे, कारण एरियलसमवेत लॉन्ड्रीकाम होते सोपे, त्यामुळे कोणी घरकामाच्या ओझ्यापासून चारहात दूर राहण्याचा प्रश्नच राहणार नाही!”


एरियलच्या Sons#ShareTheLoad मोहिमेचा व्हिडीओ इथे पहा -

https://www.youtube.com/watch?v=8QDlv8kfwIM&t=33s


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.