चंद्रपूर - माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
राजुरा येथील काँग्रेस नेते व माजी आमदार सुभाष धोटे आणि त्यांचा भाऊ राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना विनयभंगाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. धोटे बंधू संचालित नर्सिंग कॉलेजच्या एका विद्यार्थिनीने ही तक्रार केली होती. प्रकरण जुनं असलं तरी तक्रार दिल्यानं पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करून दोन्ही भावांना अटक केली.त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.