चंद्रपूर/प्रतिनिधी:
सूर्य चंद्रपूरवर चांगलाच कोपला असून गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झालेलीअसताना आणखी काही दिवस उष्णतेची लाट असणार आहे. सोमवारपासून बुधवारपर्यंत तीन दिवस चंद्रपूरकरांसाठी धोक्याचेच राहणार असून, हवामान खात्याने चंद्रपूरसाठी हिट वेव्हचा अलर्ट दिला आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांची आणखीनच होरपळ होणार आहे.
तब्बल पंधरा दिवसांपासून तापमान पंचेचाळीशीपार आहे. काही दिवस तर पारा ४६ ते ४७ अंशांपर्यंत गेला होता. सातत्याने तापमानात वाढ होत असल्याने उकाड्याने जीवाची लाहीलाही होत आहे.एप्रिलमध्येच पाऱ्याने पंचेचाळीशी पार केल्याने मे हिट ची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. मेच्या सुरुवातील हिट वेव्हचा अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. तापमानात वाढ होणार असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन मनपा आणि आरोग्य प्रशासनाने केले आहे. दुपारच्या सुमारास नागरिकांनी आवश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडूनये, दुपारच्या सुमारास उन्हात काम करू नये, दिवसभर थंड पाणी, शीतपेय प्यावे, थंड पाण्याने आंघोळ करावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडू लागले आहे. बाजार पेठेवरही याचा परिणाम होत असून, वर्दळीच्या बाजारात ग्राहकांची गर्दी कमी दिसून येत आहे. वाढत्या उन्हाचा व्यावसायिकांना चांगलाच फटका बसत आहे. तर थंडपेय, नारळपाणी, उसाचा रस, आइस गोला याला मागणी वाढली आहे.
पोल्ट्रीफीड |