गुंड प्रवृत्तीच्यावर केल्या प्रतिबंधात्मक कारवाई
मायणी: प्रतिनिधी ता.खटाव जि.सातारा
लोकसभा निवडणुकीसाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासठी पोलिस प्रशासन सरसावले असून, खटाव माण तालुक्यात येणाऱ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर शांतता भंग होऊ नये म्हणून कलम १०७अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे, मात्र या कालावधीत कोणी गुंडगिरी केलीच तर त्याला सोडणार नाही असा इशाराच पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल वडनेरे यांनी दिला आहे.
निवडणुकीचे वारे आता चांगलेच वाहू लागले आहे. या निवडणुकीत अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चांगलीच कडक मोहीम राबविली आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेल्या वाहन तपासणीत अवैध वाहतूक करणाऱ्यांना ही ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे.
तसेच चांगल्या वर्तणुकीचे बॉँड लिहून घेत कलम ११० नुसार ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, अशावर कारवाई करण्यात आली. सतत अवैध दारू विक्री करणारे, पोलिस दप्तरी दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांवर कलम ९३नुसार तडीपारी प्रस्तावित आहे. माराहाण करून दुखापत करणाऱ्या काही जणांविरोधात हद्दपारचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे.
वडूज पोलिस ठाण्यासह दोन्ही तालुक्यातील पोलिस ठाण्यांतर्गत निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासठी पोलिस कर्मचाऱ्यांची पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाची गुन्हेगार, अनोळखी व्यक्ती, अवैध धंदे, बेकायदेशीर वाहतूक यासह गुन्हेगारी वृतीच्या लोकांवर करडी नजर राहणार आहे. तर काहीजणांवर तात्पुरती तडीपारीची कारवाई केली असल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे.
निवडणुकीचा काळ हा शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी चांगलीच यंत्रणा राबविली आहे. तर सध्या वडूज सह परिसरातील काही अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पोलिसांनी टार्गेट केले आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र आहे.