नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपुरात लोहारा येथे शनिवारी रात्री 30 जनावरांचा मृत्यू झाल्याची घटनापुढे आल्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा 10 जनावरांचा मृत्यू झाला,मृत्यूचा हा आकडा वाढून आता 40 वर गेला आहे.लोहारा येथील उज्वल गौरक्षण केंद्रात 2 दिवसात 40 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर येथून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लोहारा येथे असहाय्य पशु सेवार्थ श्री उज्वल गौरक्षण संस्था चंद्रपूर केंद्र आहे. या केंद्रात वयस्क झालेले जनावर तसेच अवैधरित्या जनावरांची वाहतूक तस्करी रोखल्यानंतर ज्या जनावरांची सुटका करण्यात येते अशी जनावरे या ठिकाणी आणल्या जाते, त्यातील ३० पेक्षा अधिक जनावरांचा मागील ३ ते ४ दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. शनिवारी ही बाब समोर आल्यानंतर रात्र भरात हा आकडा वाढून 40 वर गेला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
राजुरा तालुक्यातील विरूर येथे पोलिसांनी महेश्वरी समाजाच्या काही सुजान नागरिकांच्या मदतीने अवैध जनावर तस्करीतील १२७ जनावरे पकडली होती यातील हे पकडण्यात आलेले १२७ जनावरे या श्री उज्वल गौरक्षण संस्था लोहारा येथे आणली होती.यातील २९ जनावरांचा यात गुदमरून मृत्यू झाला असे गौरक्षण प्रशासनाचे म्हणणे आहे.
या केंद्रात आणखी बरेचशे जनावरे आहेत,यातील काही जनावारांचा कापलेल्या (संशयास्पद)अवस्थेत दिसत असल्याचे निदर्शनात आले आहे.त्यांच्या शरीरातील अंतर्गत भाग बाहेर आला आहे.हि मेलेली सर्व जनावरे गावाला लागून असलेल्या मोकड्या ठिकाणी टाकून देण्यात आली आहे.
त्यामुळे लोहारा परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.शहरातून बाहेर निघत असताना मुख्य मार्गावर लोहारा हे गाव असून या परिसरात मोठे खाजगी उद्यान आहेत, सुट्टीच्या दिवशी लोक दुरून याठिकाणी आनंद लुटण्यासाठी येत असतात त्याच सोबत मोठे हॉटेल आणि धाबे देखील आहेत.आणि त्याच परिसरात हे मृत अवस्थेत असलेले जनावर टाकून दिल्याने गावात व त्या परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरली आहे,रविवारी मृत्यू झालेले आणखी 10 जनावरे देखील त्याच ठिकाणी टाकल्याने आता गावकरी भडकले आहे.
त्यामुळे याचा परिणाम गावकऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे व रोगराई फैलण्याची दाट शक्यता असल्याने प्रशासनाने या जनावरांना तत्काळ त्या ठिकाणहून उचलून त्यांना अग्नी देण्यात यावी किव्हा दफन करण्यात यावे अशी मागणी केली आहे.मृत्यूला कारण म्हणजे वेटरणरी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने या जनवरांवर थातूर मातुर उपचार केला जात आहे.मात्र योग्य उपचारा अभावी जनावरांचा मृत्यू होत आहे.