रामनवमीच्या पर्वावर सत्संग सभागृहात भक्तिमय वातावरण
चंद्रपूर दि. १६ (प्रतिनिधी):
साधना ही नियमित केल्याने शरीर मनावर आणि आतंर मनावर काय परिणाम होतात शक्तिपाताची साधना केल्याशिवाय कळत नाही. जिवनात परिवर्तन करायचे असेल तर ध्यानसाधना ही एकमेव माध्यम आहे ज्यामुळे तुमचे परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही असे प. पु. सदगुरु श्री. दादाश्री महाराजांनी महासत्संगातुन मार्गदर्शनातून केले आहे.
महाशक्ती कुंडलिनी जागरण समिती शाखा बल्लारपूर जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तिरुपती बालाजी सभागृह, बस स्टँड जवळ बल्लारपूर येथे रामनवमीच्या पर्वावर रविवार दिनांक १६ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९.०० वाजतापासून प. पु. सदगुरु श्री. दादाश्री महाराज यांच्या पावन सानिध्यात सिद्धयोगांतर्गत शक्तिपात दिव्यदिक्षा, महासत्संगाचे आयोजन करण्यात आले होते ते यावेळी विविध भजनांच्या माध्यमातून संपुर्ण सभागृह मंत्रमुग्ध केला.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी हीच शक्तिपाताची ध्यान साधना आवश्यक आहे. साधनेमुळे मनावर ताबा राहतो, विद्याथ्र्यांच्या आजच्या धकाधकीच्या जीवनात मन शांती सोबतच आत्‘बल वाढविण्यासाठी साधनेची नितांत गरज आहे जोपर्यंत आपला आत्मबल वाढत नाही तोपर्यंत आपण मोठे ध्येय गाठू शकत नाही, ध्येय गाठण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. सदर कार्यक्रमातुन त्यांनी विविध प्रकरची धुन भजने घेऊन सभागृहात भक्तिचे वातावरण निर्माण केले.
गुरुपरपंरेतुन चालत आलेली ही साधना आपल्याला मुक्तेश्वरी गुरुपिठ, निमगाव, ता. जि. वर्ध्याचे गुरुपिठाधिश, शक्तिपाताचार्य,महासिद्धयोगी, क्रांतीकारी, योगीराज,प. पु. सदगुरु श्री. प्रियानंद महाराज यांच्या माध्यमातून मिळाली असून शक्तिपाताची गुरुपरपंरा आता प. पु. सदगुरु श्री. दादाश्री महाराज यांनी पुढे नेण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्यांनी वर्ध्याला साधकांना साधना करता यावी याकरिता म्हणून ध्यान केंद्राची भव्य मोठी इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते कामही सुरु झाले आहे. त्यांचे हे कार्य सर्वांना पाठबळ देणारे असून आपली साधना नियमित राहीली तर आपण सर्वोच्च शिखर गाठुन शकु असेही बोलतांना ते म्हणाले. यावेळी चंद्रपूर, राजूरा, बल्लारपूर, मूल, वरोरा, भद्रावती, घुग्घुस तसेच नागपुर जिल्ह्यात साधक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाशक्ती कुंडलिनी जागरण समिती शाखा बल्लारपूर जिल्हा चंद्रपूरच्यावतीने अथक परिश्रम घेतले.