Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०२, २०१९

बाबूपेठ परिसरात पाच दिवसांपासून पाणी पुरवठा बंद

नागरिकांचे बेहाल 
भिवापुरात गढूळ पाण्याचा पुरवठा :प्रशासनाचे दुर्लक्ष
चंद्रपूर/प्रतिनिधी:
नळ साठी इमेज परिणाम
 सध्या उन्हाच्या झळा बसत असून काही ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र मागील काही वर्षांपासून बाबूपेठमध्ये पाण्याची टंचाई असून येथे कृत्रिम पाणी टंचाईचा सामना नागरिकांना

कशवा लागत आहे. मागील काहीमहिन्यांपासून अनियमित पाणी पुरवठाकेला जात आहे. त्यातच या आठवड्यामध्ये पाच ते सहा दिवसांपासून नळाला पाणीच आले नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्‍त केला जात आहे. दिवसातून किमान एक वेळा तरी पाणी पुरवठा करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.ऐन उन्हाळ्यातच पाच ते सातदिवसाआड पाणी येत असल्याने अनेकांची पाण्यासाठी धावपळ होत  आहे. विशेष म्हणजे, येथून काही अंतरावरच लालपेठ कॉलनी असून येथे बर्‍ऱ्यापैकी पाणी पुरवठा होतो. याच परिसरात प्रशासनातर्फे आणखी RO प्लॉट लावला आहे. त्यामुळे एकीकडे पाण्यासाठी भटकंती तर दुसरीकडे प्लांटलावून पैशाची 
उधळपट्टो अशो काहीशी अवस्था येथे आहे.
Image may contain: text
 काही दिवसांपूर्वी येथील काहीनागरिकांनी नगरसेवकांकडे  पाण्यासाठी तक्रारही केली. मात्रयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याजात असल्याचा आरोप येथोल नागरिकांनी केलाआहे. बाबुपेठ परिसरमोठा असून येथे कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्थाकरून देण्याचीही मागणी केली जात आहे.महानगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी उमेदवारांनी मोठमोठेआश्वासन दिले होते.मात्र ते सर्वआश्वासने उमेदवार विसरले असून उमेदवारांनी किमान नागरिकांच्या समस्यांकडे तरी लक्षद्यावे, अशी मागणी|केलो जात आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.