चंद्रपूर/प्रतिनिधी:
वीज थकबाकीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपणीच्या कर्मचाऱ्यांवर थकबाकीदाराने मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वा. चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डातील गवळी मोहल्यात घडली.
चंद्रपूर सब डिव्हीजन ऑफिसमध्ये कार्यरत महावितरणचे 2 कर्मचारी प्रेमानंद खंडाळे, रमेश टेकाम हे थकित बिल वसुलीसाठी गवळी मोहल्ला येथील दीपक अंबादे यांच्याकडे गेले होते. त्यांनी थकबाकीची मागणी केली असता, अंबादे यांनी खंडाळे यांना मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली व धमकी दिली ,याबाबतची तक्रार महावितरण कर्मचाऱ्याने शहर पोलीस ठाण्यामध्ये केली. पोलिसांनी आरोपीवर १८६, १८९, ३२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कर्तव्यावर असताना मारहाण केल्यानंतर दखलपात्र गुन्ह्याची नोंद करणे गरजेचे असताना पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद केल्याचा आरोप खंडाळे यांनी केला आहे.या घटने नंतर महावितरण कर्मचाऱ्यान मार्फत निषेध करण्यात आला. राज्यात याआधी देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस महावितरणवर कर्जाचा डोंगर वाढत असून थकबाकी ही वाढत असल्याकारणाने थकबाकी वसुली करण्याचे काम वसुलीपथक कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे.मात्र वसुली करणाऱ्या पथकावरच वीज ग्राहकांकडून हल्ले होत असल्यामुळे आता वीज कर्मचारी देखील चिंतेत आहेत.जर वसुलीपथकावरच अश्या प्रकारचे हल्ले ग्राहकांकडून होतील तर थकीत वसुली होणार तशी कशी? असा प्रश्न या निमित्याने समोर येत आहे.
पोल्ट्रीफीड |