Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २०, २०१९

अग्निशमन दलाच्या सुमारे चारशे जवानांनी घेतले योग प्रशिक्षणाचे धडे


दत्ताञय फडतरे (पुणे ) - 
सध्याच्या धावपळीच्या जीवनात व्यायामावर भर देताना प्राणायम तसेच योगासने याचे प्रमाण ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. आजची जीवनशैली जरी बदलली तरी व्यायामाची गरज आहेच. योग केल्याने शरीर व मन दोन्ही कसे सदृढ राहाते याचा अभ्यासच पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी नुकताच एका प्रशिक्षणातून केला. भारत स्वाभिमान न्यास, योग पंतजलि यांच्यातर्फे योग प्रशिक्षण आयोजित केले होते.

जवान कोणताही असो तो समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर व सज्ज असतोच. त्याकरिता त्याचे स्वास्थ्य सदृढ व ताण हलका करण्यासाठी अग्निशमन दलाच्या मुख्यालयात टप्प्याटप्प्याने प्राणायाम कसे करावे व ते का आवश्यक आहे त्याबाबत विविध आसने, आहार, विचार व आरोग्याची महत्वपुर्ण माहिती याचा सराव गेले महिनाभर देण्यात आला.
दलातील चारशेच्या वर जवानांनी याचा लाभ घेतला. कपाल भाती, अनुलोम विलोम, बस्ती व मंडूक आसन असे विषेश प्राणायम केल्यानंतर काय फरक जाणवतो याचा अनुभव जवानांनी प्रत्यक्ष घेतला.

या योग प्रशिक्षणाचे नियोजन अनुराधा चव्हाण व सहा. अग्निशमन अधिकारी दत्तात्रय नागलकर यांनी केले होते. तसेच योग शिक्षक श्रीकांत जगताप व आशा जगताप यांनी प्रशिक्षण दिले. अग्निशमन केंद्र प्रमुख राजेश जगताप यांनी आभार मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.