Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २०, २०१९

असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम

kavyashilp Digital Media

सिंदेवाही  -  सिंदेवाही येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही  अंतर्गत पोलीस स्टेशन  सिंदेवाही येथे  घेन्यात आला . त्यामध्ये कर्करोग व अन्य रोग (बीपी ,सुगर ) तपासणी व  त्यावर मार्गदर्शन करन्यात आले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सिंदेवाही पोलिस निरीक्षक रामटेके  साहेब उपस्थित होते.तसेच ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी, व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.  तसेच  सिंदेवाही पोलीस मित्र  व शांतता समितीची सदस्य  उपस्थित होते .पोलीस स्टेशन येथील संपूर्ण कर्मचारीनी व सिंदेवाही पोलीस मित्र  व शांतता समितीची सदस्य या सर्वांनी  तपासणी करून घेतली.    ही तपासणी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथील कर्मचारी कडून  तपासणी करण्यात आली होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.