Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २०, २०१९

पुणे जिल्ह्यातील श्री क्षेञ कानिफनाथ गडावर सोमवारी रंगपंचमी आनंदोत्सव याञा



दत्ताञय फडतरे (पुणे )
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे  पुणे जिल्ह्यातील श्री क्षेञ कानिफनाथ गड बोपगाव  या ठिकाणी  सोमवार दिनांक २५ मार्च रोजी  रंगपंचमी आनंदोत्सव याञा पार पडणार आहे.

पुणे सासवड मार्गावर असणार्या  श्री क्षेञ कानिफनाथ गडावर आठ दिवसापासुन पासुन ग्रथराज ज्ञानेश्वरी नवनाथ पारायण , अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तीभावात होत आहे.

मंगळवार दिनांक २६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम तर दुपारी चार नंतर कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडणार आहे. जिल्ह्यातील व  पंचक्रोशीतील भाविकाभक्तांनी मोठ्या संख्येने  रंगपंचमी आनंदोत्सव याञेत  सहभागी होण्याचे आवाहन नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी कानिफनाथ गड व  ग्रामपंचायत बोपगांव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.