Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २०, २०१९

मनोहर सप्रे यांना ‘वनसंवर्धन पुरस्कार’


नागपूर :– वनराई फाउंडेशन तथा म. रा. वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना – एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या संयुक्त विद्यमानाने देण्यात येणारा स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार ह्या वर्षी चंद्रपूर येथील वनांच्या संदर्भात व विशेष करून बांबूच्या संदर्भात महत्त्वाचे काम करणारे मनोहर सप्रे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
२१ मार्च हा जागतिक वनदिन आहे. मानवाच्या जीवनात वनांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वनांच्या संरक्षणासाठी अधिकारी व कर्मचारी बांधवांची महत्त्वाची भूमिका असते. उत्तमराव पाटील हे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी होते. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या क्षेत्रात भरीव कार्य करणारे, विविध वन्यजीवांचे अत्यंत बारकाईने अभ्यास करणाऱ्या मान्यवर व्यक्तीला / संस्थेला हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

हा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व संपादक सुरेश द्वादशीवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेश अग्रवाल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. हा कार्यक्रम या वर्षी २२ मार्च रोजी सायं ५.३० वा. श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह , राष्ट्रभाषा संकुल, नवीन वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकरनगर चौक जवळ , नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. विदर्भवासीयांनी ह्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान अजय पाटील ह्यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.