Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २०, २०१९

शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांचा राजीनामा


चंद्रपूर – लोकसभा निवडणुकीत कांग्रेसकडून उमेदवारीची दावेदारी करणारे शिवसेनेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत मी लोकसभेसाठी सज्ज असे उत्तर विरोधकांना दिले. राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. राजीनामालोकसभेसाठी कांग्रेसकडून विशाल मुत्तेमवार यांचं नाव समोर येताच कांग्रेस गुटात खळबळ उडाली होती नंतर जिल्ह्यातील कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठीकडे मुत्तेमवारांच्या उमेदवारीचा विरोध दर्शविला, त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी तात्काळ बैठक बोलावत चंद्रपूर लोकसभेसाठी कुणाचं नाव जाहीर केलं नाही.

कांग्रेसकडून माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार विजय वडेट्टीवार व आमदार बाळू धानोरकर यांची नावे चर्चेत होती परंतु ऐनवेळी मुत्तेमवार यांचं नाव समोर येताच चंद्रपूर कांग्रेसमध्ये नाराजी पसरली. आता आमदार बाळू धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत लोकसभा लढविण्याची पूर्ण तैयारी केली आहे, कांग्रेस पक्षातर्फे त्यांना आधी राजीनामा द्या नंतर आपल्याला लोकसभा निवडणूक साठी कांग्रेसकडून उमेदवारी देऊ असे निर्देश दिल्याची माहिती विश्ववसनिय सूत्रांकडून मिळाली, आता ही लोकसभा निवडणूक अहिराना कठीण जाणार कारण आता त्यांच्यासमोर बाळू धानोरकरांच तगडे आवाहन असणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.