Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च २०, २०१९

जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षी जलपात्रांचे वितरण

kavyashilp Digital Media
  • चिमणी पक्षी संवर्धनासाठी इको-प्रो तर्फे मार्गदर्शन
  • इको-प्रो व लोकमान्य कन्या विदयालय चा संयुक्त उपक्रम

चंद्रपूर - आज 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त इको-प्रो व लोकमान्य कन्या विद्यालयतर्फे जनजागृती कार्यक्रम व पक्षी जलपात्र वितरणांचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
आज संपुर्ण जगात घर-परिसरात वावरणारी सर्वपरिचीत चिमणी या पक्ष्यांचे संवर्धनाकरिता जागतीक पातळीवर ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा केला जातो. कधीकाळी नेहमिच चिमण्यांच्या चिवचिवाटाने होणारी सकाळ आता विस्मृतीत गेल्यासारखे झाले आहे. आता केवळ बालपणीच्या या आठवणी आहेत, अलिकडच्या पिढीला ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा सुध्दा सांगता येत नाही’ कारण चिमण्यांची संख्याच कमी झालेली आहे. वाढते शहरीकरण, क्राकीटीकरण किंवा पुर्वीची कौलारू घरे, अंगणात धान्य निवडणाÚया गृहीणी हा प्रकार नसल्यामुळे पुर्वीसारखी आपल्या मानवी वसाहतीत चिमण्याकरिता नैसर्गीक अधिवासात घरटे तयार करता येत नाही. या पाश्र्वभुमीवर चिमणी संवर्धनाकरिता जागतिक चिमणी दिवस 20 मार्च 2010 रोजी पहिल्यांदा पाळला गेला.

या बाबीचा विचार करून दरवर्षी इको-प्रो तर्फे ‘मिशन सेव्ह बर्ड’ अंतर्गत ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा करून शालेय विदयार्थी मध्ये जनजागृती करण्यात येत असते. यंदा स्थानिक लोकमान्य टिळक कन्या विदयालयाच्या संयुक्त विदयमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातुन ‘चिमण्याचे नैसर्गिक अधिवास संवर्धन यावर मार्गदर्शन तर येत्या उन्हाळयात पक्ष्यांकरिता ठेवण्याकरिता जलपात्र वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शाळेच्या उपमुख्याधापिका सौ. बंडीवार मॅडम, प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बंडु धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था, नितीन रामटेके, विभाग प्रमुख, इको-प्रो पर्यावरण विभाग, रविंद्र गुरनुले, विभाग प्रमुख, इको-प्रो शिक्षण विभाग, शाळेचे कलाशिक्षक अरूण कत्रोजवार प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी चिमणी दिनाचे महत्व सांगुन चिमणी सारखा पक्षी लहानपणापासुन आपणास निसर्गाची ओळख करून देणारा पक्ष्यांची आज संख्या कशी कमी होत आहे, त्याकरीता विदयार्थी ही भावी पिढी म्हणुन चिमण्याचे संरक्षण-संवर्धन आपल्या घर-परिसरात कसे करता येईल, यासोबतच पर्यावरण कसे सांभाळता येईल याबाबत मान्यवरांनी विदयार्थीनीना मार्गदर्शन केले. सोबतच यावेळी उपस्थित विदयार्थीनींना पक्षी जलपात्रांचे वाटप करण्यात आले. उन्हाळयात चंद्रपूर शहरातील वाढते तापमान लक्षात घेता पक्ष्यांचे पाण्याअभावी मृत्यु होउ नये याकरिता आपल्या घर परिसरात पक्ष्यांचा वावर असेल तिथे, अंगणात, परसबागेत, बालकणीमध्ये, सावलीच्या ठिकाणी टेरेसवर पक्ष्यांकरिता सदर मातीचे जलपात्र ठेवण्याचे आवाहन यावेळी मार्गदर्शकांकडुन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे संचालन वंदना एंगलवार यांनी तर आभार अरूण कत्रोजवार यांनी मानले. यावेळी इको-प्रो चे धमेंद्र लुनावत, बिमल शहा, सचिन धोतरे, ओमजी वर्मा, राजु काहीलकर, राजेश व्यास तसेच लोकमान्य टिळक विदयालयाचे शिक्षकवृंद श्री मनोज साळवे, श्री. अनंत डेहनकर, सौ. महादाणी मॅडम, सौ. बडकेलवार मॅडम, सौ. रूपा चंदावार तसेच शाळेच्या शेकडो विदयार्थीनी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.