Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च २३, २०१९

वाडी पोलिस स्टेशनमध्ये बीएलओ वर गुन्हा दाखल

पक्ष कार्यकर्त्यांचा उतावीळपणा,अधिकाऱ्याला भोवला 
नागपूर / अरूण कराळे:
Image result for wadi police
भारत निवडणूक आयोगातर्फ़े १८ वर्ष पूर्ण करणारा भारतीय नागरिक येत्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहू नये म्हणून मागील ३ महिन्यापासून नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम स्थानिक प्रत्येक जिल्हातील निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला त्यानुसार मतदाराचे ओळखपत्र संबंधित विभागातर्फे ( बीएलओ ) बुध स्तरीय अधिकारी व त्यांच्या सहकारी मार्फत प्रत्येक मतदाराला त्याच्या घरपर्यंत जाऊन पोहचविणे ही बीएलओ व त्याच्या नियंत्रणात काम करणाऱ्या टीमची जबाबदारी असतांना वाडी परिसरात एका पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यामार्फत ओळखपत्र वाटल्या गेल्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडवून संबंधीत पक्ष कार्यकर्त्यांच्या स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दाखविलेला उतावीळपणा व निवडणूक आयोगाच्या नियमाची पायमल्ली केल्यामुळे बीएलओवर वाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 मा .भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले पीवीसी इपीक PVC EPIC कार्ड संबंधित तालूका मतदार नोंदणी अधिकारी/तहसिलदार यांचे मार्फत पटवारी यांच्याकडे पाठविले जाते त्यानूसार त्या केंद्रातील बूथ स्तरीय अधिकारी बीएलओ यांच्या मार्फत संबंधित मतदारांना ओळखपत्र घरपोच पोहचविणे अशी प्रक्रिया असतांना वाडी केंद्रातील एका पक्षाच्या कार्यकर्त्याने संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला भेटून मी कार्ड वाटतो असे सांगितल्यावर संबंधित कर्मचाऱ्याने सहानुभूतीने हे कार्ड त्या कार्यकर्त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर ज्या वॉर्डाचे कार्ड होते.

 त्या भागात जाऊन स्वतःच्या प्रसिद्धी करीता तसेच एक सामाजिक कार्य समजून मतदारांना घरी जाऊन असा कोणताही अधिकार नसतांना कार्ड वाटप करीत असल्याचे फोटो काढुन सोशल मीडियावर फोटो वायरल केल्याने हे प्रकरण उघडकीस आल्यावर नागपूर ग्रामीणचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी संबंधित बूथ स्तरीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले तसेच सदर बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने लोकप्रतिनिधी अधिनियम१९५१ अंतर्गत कारवाई करित वाडी पोलिसांत सदर बीएलओच्या विरोधात नायब तहसीलदार यांनी तक्रार केली असल्याने कलम ३२ लोकप्रतिनिधींत्व अधिनियम१९५० , १९५१ , १९८९ नुसार गुन्हा नोंदविला असून वाडी पुढील तपास करीत आहे. संबंधीत बीएलओवर गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.