Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १५, २०१९

निबंध स्पर्धेत शिक्षकगटात जिल्हास्तरावर वैशाली कांबळे प्रथम क्रमांक

मायणी ःता.खटाव जि.सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मायणी मुले येथील उपशिक्षिका  वैशाली गोपाळ कांबळे यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई  यांच्या109व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध  स्पर्धेत शिक्षक गटात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.

   स्व. बाळासाहेब देसाई ट्रस्ट व पंचायत समिती पाटण यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सभापती उज्ज्वला जाधव,उपसभापती राजाभाऊ शेलार,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,   गटशिक्षणाधिकारी आर .पी. निकम इ मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .

    या यशाबद्दल त्यांचे गटशिक्षणाधिकारी पिसे साहेब, विस्तार अधिकारी जाधव मॅडम, डॉ. श्यामसुंदर मिरजकर,केंद्र प्रमुख जगदाळे साहेब , व शिक्षक वर्ग इ नी अभिनंदन केले


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.