Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १५, २०१९

कायदयाचा अभ्यास करून सशक्त नारी बना:राजरत्त बनसोड

दवलामेटीत महीलांसाठी कौटुंबीक मार्गदर्शन शिबीर 
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:
प्रत्येक महीलांना कायद्याचे ज्ञान येणे आवश्यक आहे . आज स्त्री -पुरुष समानता असुन स्वतःचे निर्णय स्वःत घेऊन महीलांनी आपले अस्तीत्व कायम राखा .कायदयाचा अभ्यास करून सशक्त नारी बना असे आवाहन सहाय्यक आयुक्त राजरत्त बनसोड यांनी केले .

दवलामेटी येथील हिल टाॅप काॅलनीमधील बुटले ले - आऊटमध्ये माही बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित आधार कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्रात जागतीक दिनाचे औचित्य साधत महिलांमध्ये नविन कायद्याविषयी माहिती व महिला परिवर्तन सशक्तीकरण या विषयावर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला . अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त राजरत्त बनसोड होते . प्रमुख पाहूणे म्हणून दवलामेटी ग्रामपंचायतचे उपसरपंच गजानन रामेकर ,वाडीच्या पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी, अभिमन्यू मेंघरे प्रामुख्याने उपस्थित होते .सर्वप्रथम सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले . पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी नवीन कायदा व महिला अत्याचार, उपसरपंच गजानन रामेकर यांनी महिलांचा सन्मान व अधिकार या विषयी मार्गदर्शन केले .प्रास्तावीक माही बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सोनु विजय चुटे, संचालन अॅड.सुनंदा निंबाळकर यांनी केले . यावेळी कोषाध्यक्ष मनीषा लिचडे , वैशाली रामेकर,केशर तायडे ,वंदना पोतदार, माही चुटे ,शांता मेंघरे, कोमल सय॔वंशी, श्रीमती इंगळे मालती सक्सेना , श्रीमती विरखरे , श्रीमती सहापायले प्रामुख्याने उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.