वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:
वाडी नगर परिषद परिसरात नियम व नियोजनानुसार नागरिकांच्या सेवेकरिता अग्नीशामन गाडीची आवश्यक होती. याची दखल घेत नगर परिषद प्रशासनाने मंगळवार १२ मार्च रोजी अग्नीबंबासह अधिकारी व कर्मचारी मंगळवार १२ मार्च रोजी दाखल . मुख्याधीकारी राजेश भगत यांच्या हस्ते अग्नीशमन गाडीची पूजा व स्वागत करून नागरिकांच्या सेवेसाठी रुजू केली. वाडी नगर परिषद ची स्थापना होऊन जवळ जवळ चार वर्षाचा काळ लोटून गेला.एक लाख लोकसंख्येच्या नगर परिषद मध्ये आग लागण्याच्या छोट्या मोठय़ा दुर्घटना होतच राहतात. त्याकरिता येथील नागरिकांना एमआयडीसी, नागपूर मनपा, डिफेन्स येथून आग विझविण्यासाठी अग्नीशमन गाडी बोलवावी लागत होती . बर्याच वेळा अग्नीशमन गाडी उशिरा पोहोचण्याच्या घटना पहावयास मिळाल्या त्यामुळे नुकसान सोसावे लागत होते .
या गंभीर सेवेची दखल नगर परिषद प्रशासनाने घेऊन अग्नीशमन गाडी नगर परिषद मध्ये दाखल झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी अग्निशमन विभागाचे अधिकारी रोहित शेलारे ,स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे, शहर समन्वयक पिंकेश चकोले, लक्ष्मण ढोरे ,रमेश इखनकर, कमलेश तिजारे, भारत ढोके , प्रदीप गभने,मनोहर वानखेडे , जालंधर जवंजाळ, आनंद भगत प्रामुख्याने उपस्थित होते.


