Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १४, २०१९

नियमाचा भंग करणाऱ्या प्रिंटर्सला सहा महिन्याची शिक्षा

राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार व
 मुद्रणालयांच्या चालक मालकांना सक्त सूचना
चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image result for सहा महिन्याची शिक्षा
 आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणतेही मुद्रण साहित्य व फ्लेक्स लावताना निवडणूक काळामध्ये घ्यावयाच्या काळजीचे व कायद्याचे पालन करणे अत्यंत आवश्‍यक असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटर्सवर सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 127-अ आणि त्याव्दारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिध्दीवर घालण्यात आलेले निर्बंध यांच्याकडे सर्व राजकीय पक्षाचे, निवडणूक लढविणा-या उमेदवारांचे आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकाचे लक्ष वेधण्यात येत आहे.

उक्त कलमान्वये प्रथम असे विहीत करण्यात आलेले आहे की, हाताने नक्कल काढण्या व्यतिरीक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यांत किंवा अनेक प्रती काढण्यात आलेले निवडणुकीसंबंधीचे प्रत्येक पत्र हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भिंतीपत्रक यांच्या दर्शनी भागावर मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नांव व पत्ता प्रसिध्दी करणे बंधनकारक आहे.

असा कोणताही पत्रक मुद्रकांने इच्छुक प्रकाशकांकडून त्यांनी स्वत: स्वाक्षरीत केलेले आहे. त्या व्यक्तीला व्यक्तीश: ओळखतील अशा दोन व्यक्तींनी साक्षाकिंत केलेल्या त्या प्रकाशकाची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्र (दोन प्रतीमध्ये) घेणे अत्यावश्यक केले आहे. 

दस्तऐवज छापण्यात आल्यानंतर तसेच मुद्रकांने प्रतिज्ञापत्राची एक प्रत व पत्रक इत्यादीच्या चार प्रती ते पत्रक राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी छापण्यात आले असेल तर मुख्य निवडणुक अधिका-यांकडे आणि इतर कोणत्याही प्रकरणी दस्तऐवज जेथे छापण्यात आले असेल त्या जिल्हयाच्या जिल्हा दंडाधिका-यांकडे 3 दिवसांचे आंत सादर करण्यात यावे. त्यासोबत छपाई केलेल्या पत्रकासाठी किती मोबदला घेतला याबाबत ठराविक प्रपत्रात माहिती देण्यात यावी. तसेच सर्व संबंधितांनी या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीचे कार्यात कायदेशिर तरतूदीचे पालन करुन निवडणूक कामाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

वरील कलमाच्या कोणत्याही उपबंधाचे उल्लंघन करणा-यास सहा महिण्यापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा दोन हजार रुपयापर्यंत दंडाची अथवा या दोन्ही शिक्षेस पात्र ठरेल. त्यामुळे राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार व मुद्रणालयांच्या चालक मालकांनी यांची नोंद घ्यावी.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.