Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १४, २०१९

वनविभाग व नागरिकांमधील दुवा म्हणजे स्वयंसेवी संस्था:एस. भागवत

सार्ड संस्थेचा वने व वन्यजीव कायदे यावर मार्गदर्शन कार्यक्रम 
चंद्रपूर/प्रतिनिधी:

प्रेत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे असतात, तसेच उत्तरही. कित्येक वेळा गैरसमजा मुळे नागरिक व वनविभाग यांच्यात दरी निर्माण होते. यासाठी वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था समन्वय साधून मोठी मदत करू शकतात. असे प्रतिपादन ताड़ोबा अंधारी व्याघ्र प्रकाल्पाचे विभागीय वनाधिकारी श्री एस. भागवत यांनी सार्ड संस्थे द्वारा आगरझरी येथील कॉन्फरन्स हॉल इथे आयोजित एकदिवसीय" वने व वन्यजीव कायदे विषयक कार्यशाळा"या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात ते उदघाटक म्हणून बोलत होते.अध्यक्ष स्थानी श्री प्रकाश कामडे होते , तर मुख्य मार्गदर्शक म्हणून ऍड. रंजन खटी व प्रमुख पाहुने श्री .राजेश पेशेट्टीवार प्राचार्य साई ओद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपुर हे होते. 

या दीवसभर चाललेल्या कार्यशाळेत दोन सत्र घेण्यात आले.आणि दोन्ही सत्रात अड.रंजन खटी यानी विस्तृत मार्गदर्शन केले. प्रथम सत्रात भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972(Indian wild life protection Act, 1972) व जेवनानंतर दुसऱ्या सत्रात भारतीय वन अधिनियम 1927 Indian Forest Act 1927) या दोन कायदयाव्रर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. शेवटच्या सत्रात प्रश्न उत्तरे घेण्यात आली उपस्थितानि भरपुर प्रश्न विचारुण शहानिश्या करुण घेतली. विभागीय वनाधिकारी श्री.भागवत यानी वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या सार्ड संस्थे सारख्या अश्या अनेक सस्थाचि वंनविभागाला भरपूर मदत होत असते आणि या सस्था नागरिक आणि वनविभाग यांच्यातील दुवा आहेत .त्या सस्था आपले स्वताचे काम कश्या पद्धतिने वाढऊ शकते हे समजावून सांगितले. सार्ड चे अध्यक्ष श्री. प्रकाश कामडे यानी स्वंयसेवि सस्थांचे वन्यजीव सवर्धनात काय योगदान राहु शकते तसेच स्वयंसेवकानी आपल्या मर्यादा ओळखून कसे काम करावे , वन्यजीवांची सेवा हीच इश्वराची सेवा आहे हे समजूनच कार्य करावे असे मत मांडले. राजेश पेशट्टीवार यानी माध्यमिक शिक्षणा पासूनच विद्यार्थ्यांना वने व वन्यजीव सवर्धनाची आवड निर्माण व्हावी या साठी प्रयत्न व्हावेत तसेच या साठी वनविभाग आणि संस्थांनी पुढाकार घ्यावा असे मत मांडले.या कार्यशाळेचे संचालन संजय जावड़े यानी तर आभार प्रदर्शन स्वप्नील राजुरकर यानी केले. 

या कार्यशाळेसाठी मंगेश लहामगे, विलास माथनकर,आशिष घुमे,मोंटू खंडेलवार,अब्दुल पठान,प्रशांत मैत्र, गुरप्रीत सिंग कलशी,रामसिंग,रामटेके,अजित सिंग,अमोल येरगुड़े,ढेंगले यानी अथक प्रयत्न केले. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.