नागपूर/प्रतिनिधी:
पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्रदुषण नियंत्रित करणे आणि वीज ग्राहकांचे पैसे वाचविणे या उद्देशाने महावितरणने सुरु केलेल्या पेपरलेस वीजबिल अर्थात गो-ग्रीन संनेला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून महावितरणच्या गो-ग्रीनच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, नागपूर परिक्षेत्रातील अब्बल 5 हजार 713 ग्राहकांनी मासिक वीजबिलांसाठी कागदविरहीत गो-ग्रीन चा पर्याय स्विकारला आहे. या ग्राहकांना मासिक बिलात 10 रुपये सुट दिल्या जात आहे.
साधारणत: ए4 आकाराचा व 80 जीएसएम जाडीचा एक टन कागद निर्मितिसाठी 17 झाडांची आवशक्यता असल्याने कागदी वीज बिलांचा वापर कमी करून ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारणा-या ग्राहकांना प्रती वीजबिल 10 रुपये सवलत जाहीर केली होती, त्यास सकारात्मक प्रतिसाद देत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील 5 हजार 713 ग्राहकांसह राज्यभरातील सुमारे 38 हजार 472 वीजग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. अन्य ग्राहकांनीही या पर्यायाचा स्विकार करून पर्यावरण संरक्षणाच्या कार्याला हातभार लावण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
वीजबिल ऑनलाइन पाण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील बिलही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात अशा ग्राहकांना छापीला ऐवजी ई-मेल व एसएमएस द्वारे वीजबिल उपलब्ध करून दिल्या जाते. अशा सर्व ग्राहकांना प्रति देयक दहा रुपये सवलत दिली जाते. गो-ग्रीन चा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीज बिलावरील गो--ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाईल ॲप द्वारे अथवा महावितरणच्या http://consumerinfor.mahadiscom.in/gogreen.php किंवा http:/wss.mahadiscom.in/wss येथे करावी असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या अकोला मंडलातील 608, बुलढाणा मंडलातील 710, वाशिम 229. अमरावती 871, यवतमाळ 559, चंद्रपूर 474, गडचिरोली 235, भंडारा 293, गोंदीया 318, नागपूर ग्रामिण 341, नागपूर शहर 537, नागपूर वितरण फ़्रॅन्चाइज़ी 158 तर वर्धा मंडलातील 380 वीजग्राहकांनी गो-ग्रीनचा पर्याय स्विकारला आहे. हा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने विजबील मिळत असून संदर्भासाठी वीज बिलाचे जतन करणे त्यांना सोपे ठरणार आहे. गो-ग्रीन चा पर्याय पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणार असल्याने जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रिन सुविधेचा लाभ घ्यावा. असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. डिसेंबरपूर्वी गो-ग्रीन चा वापर करणाऱ्या ग्राहकांना तेव्हा तीन रुपये प्रति देयक सुट मिळायची त्यामुळे फारच थोड्या ग्राहकांनी गो ग्रीन मध्ये सहभाग नोंदवला होता मात्र सूट दहा रुपये झाल्यानंतर मागील दोन महिन्यात गो-ग्रीन चा पर्याय स्वीकारणा-या ग्राहकांच्या संख्येत उल्लेखनिय वाढ होत आहे
गो-ग्रीन चा पर्याय स्विकारना-या ग्राहकांचा तपशिल
कार्यालय ग्राहक संख्या
अकोला मंडल 608
बुलढाणा मंडल 710
वाशिम मंडल 229
अकोला परिमंडल 1547
अमरावती मंडल 871
यवतमाळ मंडल 559
अमरावती परिमंडल 1430
चंद्रपूर मंडल 474
गडचिरोली मंडल 235
चंद्रपूर परिमंडल 709
भंडारा मंडल 293
गोंदीया मंडल 318
गोंदीया परिमंडल 611
नागपूर ग्रामिण मंडल 341
नागपूर शहर मंडल 537
वितरण फ़्रॅन्चाइझी 158
वर्धा मंडल 380
नागपूर परिमंडल 1416
नागपूर परिक्षेत्र एकूण 5713