Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १४, २०१९

किमान वेतन देणारे राज्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय

kavyashlp Digital media

  • जनविकास सेनेच्या कामगार आंदोलनाला अभूतपूर्व यश
  • कामगारांच्या वेतनामध्ये दुप्पट वाढ
  • चवथ्या दिवशी बेमुदत उपोषण स्थगित
  • थकीत पगार 4 दिवसात देणार


चंद्रपूर - जन विकास सेना संलग्नित जन विकास कामगार संघाच्या बेमुदत काम बंद व उपोषण आंदोलनाला आज अभूतपूर्व व यश मिळाले. किमान वेतन व चार महिन्यांचा थकीत पगार देण्यात यावे या मागणीकरिता मागील दोन मार्च 2019 पासून कामगारांनी जन विकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात बेमुदत कामबंद आणि धरणे आंदोलन साखळी उपोषण इत्यादी केल्यानंतर दिनांक 11 मार्च 2019 पासून कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.
काल दिनांक 13 मार्च रोजी पालक मंत्री यांच्या घरासमोर निदर्शने करून ठिय्या दिल्याने पोलीस व प्रशासनाची तारांबळ उडाली. यानंतर दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिष्ट मंडळाने उपोषण मंडपाला भेट देऊन किमान वेतनला मंजुरी देणाऱ्या शासन आदेशाची प्रत दिली. दिनांक 8 मार्च 2019 च्या तारखेत निघालेल्या हा शासन आदेश काल 13 मार्च 2019 रोजी चंद्रपूरच्या अधिष्ठाता कार्यालयाला प्राप्त झाला.विशेष म्हणजे राज्यातील सर्व व वैद्यकीय महाविद्यालयांकरिता निघालेला आदेश नसून केवळ चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्याकरिता अतिरिक्त निधी ला मंजुरी देण्यातकरिता हा आदेश काढण्यात आलेला आहे. 

नवीन कंत्राटात सर्व कामगारांना सामावून कामगारांना त्यांच्या अनुभवा नुसार पदस्थापना द्यावी व कोणत्याही कामगारावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येऊ नये,किमान वेतनाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी व व थकित पगार तातडीने देण्यात यावा या अटी ठेवण्यात आल्या.जिल्हाधिकारी श्री खेमनार यांनी या सर्व मागण्या बाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे यांच्याशी चर्चा करून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शिष्टमंडळाचे उपस्थित डॉक्टर अधिष्ठानाचा डॉक्टर एस एस मोरे व कामगारांच्या मुलांनी उपोषण करताना शरबत उपोषण सोडले. यावेळी जनविकासचे अध्यक्ष पप्पू देशमुख, सरचिटणीस गुरुदास कामडी सचिव सतीश खोबरागडे सर्व पदाधिकारी जन विकास कामगार संघ व महिला सेनेचे सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी ज्योती कांबळे,रेश्मा शेख़, रमा अलोने, रश्मी नगराळे, सुनिता रामटेके, सुनिता वाळके ,नंदा आत्राम, सिंधु चौधरी, बबिता लोडेल्लिवार, उज्वला रामटेके, रवि काळे, मोहन आंधोरे, भोजराज शेट्टी, किशोर रोहनकर, गणेश चांदेकर, लता उंदीरवाडे, चित्रा सिंग राठोड, सुनिता झुंगरे, सपना नागपूरे, सपना दुर्गे, कविता सागौरे, सचिन वाटेकर, अंकित वाघमारे, रोशन पाथर्ड, पुष्पा गुमलवार, सरिता खोब्रागडे, अनिता गोरेवार, सुरेखा मडावी, लता उईके या सर्व उपोषणकर्त्यांना शरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.