नागपूर/प्रतिनिधी:
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर सामाजिक बांधिलकीतून या हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून फुल ना फुलाची पाकळी या तत्त्वावर "भारत के वीर" या वेबसाईटवर सहयोग निधी जमा करण्यात आला.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.अनंत देवतारे, मुख्य अभियंता (स्थापत्य-२) कोराडी यांनी भूषविले. श्री मिलिंद नातू, मुख्य अभियंता सोलर यांनी सुध्दा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. त्यांनी महिलांच्या प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्वावर गौरवोद्गार काढले.
प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती निलम बोवाडे संस्थापक (मनस्विनी फाऊंडेशन - वंचित मुली आणि स्त्रियांचे शिक्षण आणि सशक्तीकरण यासाठी काम करणारी अशासकीय संस्था) यांनी, महिलांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःचा उत्कर्ष कसा साधावा या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रामुख्याने उपस्थित डॉ. माधुरी गावंडे, स्त्रीरोग तज्ञ (अमेरिकन ओन्कलॉजी इन्स्टिट्यूट नागपूर) यांनी गंभीर दखल घ्यायला लावली कि, भारतीय स्त्रियांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या गर्भाशयाच्या कर्करोगाची जागा आता स्तनाच्या कर्करोगाने घेतलेली आहे. त्यात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढतच आहे. महिलांनी घाबरून न जाता प्रसंगाला सामोरे जाऊन प्रतिबंधक उपाय आणि नंतर घ्यावयाची काळजी/तपासण्या या बद्दल सखोल माहिती दिली.
डॉ. पल्लवी राणे यांनी सांगितले की स्वतः रोगी असल्यास निरोगी समाजाची बांधणी आपण करू शकत नाही. स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देणे आणि निरोगी राहणे हे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
डॉ.किरण तिवारी यांनी स्वस्थ जीवन जगण्याकरिता आपला आहार विहार, आपली जीवनशैली, बदलत्या जीवनशैली मुळे आहाराचे आपल्या शरीरावर होणार दुष्परिणाम आणि करावयाचे बदल याबद्दल सखोल माहिती दिली. तसेच सौ प्राची दाणी यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित एकांकिकाचे अतिशय प्रभावीपणे सादरीकरण करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
अध्यक्षीय भाषणात श्री अनंत देवतारे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन, अमलबजावणी समर्थपणे केल्याबद्दल सर्व महिला अधिकारी) कर्मचारी यांचे कौतुक केले.अनेक आघाड्या समर्थपणे पेलून महिला विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत याबद्दल कौतुक केले.
सौ सविता झरारिया, महाव्यवस्थापक (लेखा), कार्यकारी अभियंता सौ किरण नानवटकर, श्री विष्णु ढगे, श्री शिरीष वाठ, श्री मनीष घोडेस्वार इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मरक्षिका वासनिक, मीनल भटकर यांनी तर आभार प्रदर्शन दीप्ती मेश्राम यांनी केले.
महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अधीक्षक अभियंता श्री जयदीप रामटेके, श्री नारायण राठोड, वरिष्ठ व्यवस्थापक (मास) श्री रवि अग्रेलवार, सर्व विभाग प्रमुख, महिला अधिकारी/ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य अभियंता श्री. राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही कार्यालयातील महिलांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ सविता झरारीया, सौ किरण नानवटकर, श्री विष्णु ढगे, सौ हीना खय्याम, सौ दीप्ती मेश्राम, मंगला गौरकर, श्री अतुल गावंडे, सौ सोनिया खोब्रागडे, सौ स्मिता पोकळे, आश्लेषा राणे, सौ उषा अडेकर, मनीषा माटे , सौ.सिंधू सोनकुसरे इत्यादींचे मोलाचे सहकर्य लाभले.