हेड कॉन्स्टेबल रविंद्र बबन धनवाडे यांना मरणोपंरात शौर्य चक्र
दिनांक 26 ऑगस्ट 2017 मध्ये जम्मु आणि काश्मीरातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनवाडे यांनी या चकमकीत सर्वोच्च बलिदान दिले. हेड कॉन्स्टेबल धनवाडे यांना मरणोपंरात शौर्य चक्राने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांची आई आणि पत्नी यांनी स्वीकारला.
राष्ट्रीय राइफल्सचे महेश सप्रे यांना शौर्य चक्र
राष्ट्रीय राइफल्सचे महेश सप्रे यांना शौर्य चक्र
राष्ट्रीय राईफल्स 44 तुकडीचे महेश सप्रे यांनी 3 ऑगस्ट 2018 रोजी जम्मू आणि काश्मिरमध्ये एका गावात झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी दोन हात केले. यामध्ये एका दहशतवाद्याला जख्मी केले तर अन्यंना पळवून लावले त्यांच्या समयसुचकतेमुळे मोठी घटना टळली. त्यांच्या या अदम्य पराक्रमासाठी त्यांना आज शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
मराठी भाषिक 3 सैन्य अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा मेडल
लेफ्टनन जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना त्यांच्या सैन्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले. यापूर्वी त्यांना‘अतिविशिष्ट सेवा मेडल’, ‘सेवा मेडल’, ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आलेले आहे.
लेफ्टनन जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस यांना सैन्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल आज ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले. यापुर्वी यांना ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आलेले आहे.
मेजर जनरल (निवृत्त) विजय ज्ञानदेव चौघुले यांनाही सैन्यातील धैर्ययुक्त सेवेबद्दल ‘परम विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आले. यापूर्वी या‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आलेले आहे.
मराठी भाषिक 3 सैन्य अधिका-यांना अति विशिष्ट सेवा मेडल
लेफ्टनन जनरल शंशाक ताराकांत उपासणी यांना सैन्यातील साहसपुर्ण सेवेसाठी ‘अति विशिष्ट सेवा मेडल’ ने गौरिावण्यात आले. यापुर्व त्यांना‘सेवा मेडल’, ‘विशिष्ट सेवा मेडल’ प्रदान करण्यात आलेले आहे.
जम्मु आणि काश्मिर राईफल्सचे ब्रिगेडीयर संजीव लांघे यांना सैन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी आज ‘अति विशिष्ट सेवा मेडल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एयर कमांडर धनंजय वसंत खोत फ्लाईंग पायलट यांनी देश संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना आज ‘अति विशिष्ट सेवा मेडल’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
0000