संच क्रमांक 5 मध्ये सलग 100 दिवसांपासून वीज उत्पादन
29 वर्षे जुन्या संच क्रमांक 2 मध्ये सलग 150 दिवसांपासून वीज उत्पादन
30 वर्षे जुन्या संच क्रमांक 1 मध्ये सलग 84 दिवसांपासून वीज उत्पादन
नागपूर/प्रतिनिधी:
गत वर्षात संचालक पाच सूत्री कार्यक्रम अंतर्गत कोळसा खपत व आंतरिक वीज खपत कमी करण्याच्या उद्देशाने खापरखेडा येथे सर्वच संचांच्या रखरखावावर व विश्वासार्हता सुधारण्याकरिता केलेल्या विविध कामांचे परिणाम सुस्पष्टपणे दिसून येत आहेत.
गेल्या आठवड्यात एक आगळा वेगळा कीर्तीमान खापरखेडा वीज केंद्राने प्रस्थापित केला. 500 मेगावाट संच क्रमांक 5 ने 10 मार्चला कमिशनिंग पासून आतापर्यंतचा 92 दिवसांचा उच्चांक मोडून काढत 100 दिवस पूर्ण केलेत तर संच क्र 2 ने 9 मार्चला कमिशनिंग पासून आतापर्यंतचा 146 दिवसांचा उच्चांक मोडून काढत 150 दिवस पूर्ण केलेत. संच क्र 2 हा 29 वर्षांपूर्वी कमिशन झालेला संच आहे हे विशेष.
30 वर्ष जुना संच क्र 1 सुद्धा मागील ओवर हॉल नंतर 18 डिसेम्बर पासून अविरत सुरू असून आजपर्यंत त्याला 84 दिवस पूर्ण झाले आहेत.सगळेच संच वीज उत्पादन व्यवस्थित करीत असून महानिर्मितीला वीज उत्पादनामध्ये खापरखेड्याचा मोलाचा हातभार लागत आहेत.
महानिर्मिती वरिष्ठ व्यवस्थापनाचे वेळोवेळी मार्गदर्शन तसेच खापरखेडा वीज केंद्रातील अधिकारी-कर्मचारी,तंत्रज्ञ,कंत्राटी कामगार, पुरवठादार,कंत्राटदार, संघटना प्रतिनिधी यांच्या परस्पर सहकार्यामुळे हे शक्य होत असल्याचे मत मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी व्यक्त केले.