ब्रह्मपुरी/प्रतीनिधी:
ब्रम्हपुरी, सिंदेवाही आणि सावली तालुक्यातील विकासकामांसाठी ग्रामविकास विभागाच्या मुलभूत सुविधा योजनाअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभाग मंत्रालयाला लेखी निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १.५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे..
आमदार विजय वडेट्टीवार मतदार संघाच्या दौऱ्यात असताना नागरिकांनी निवेदन दिले होते. त्यामुळे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर गावातील पाहणी करून कालबद्ध रूपरेषा तयार करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना करीत पाठपुरावा केला. नुकतेच ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढले असून, या परिपत्रकानुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील रामपुरी येथे बौद्ध परिसरात सामाजिक सभागृह ७ लक्ष, गोगाव येथे नाल्या व सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम १० लाख, तळोधी खुर्द सामाजिक सभागृह ७ लाख, उदापुर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, दुधवाही सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, धानोलीपोहा चक बौद्ध परिसरात सामाजिक सभागृह ६ लाख रानबोथली बौद्ध परिसरात सामाजिक सभागृह ७ लाख, परसोडी सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, सिंदेवाही तालुक्यातील नैनपूर नाली व सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, सिंदेवाही येथे आदिवासी समाज सामाजिक सभागृह ७ लाख, सिंदेवाही येथे सेवानिवृत्ती शिक्षक सामाजिक सभागृह १० लाख, मिनघरी येथे माळी समाज सामाजिक सभागृह ७ लाख, पवनचक येथे सामाजिक सभागृह ७ लाख, रामाळा येथे सामाजिक सभागृह ७ लाख, सावली तालुक्यातील सोनापूर येथे सामाजिक सभागृह ७ लाख, खैरी येथेअंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम ७ लाख, निमगाव नविन वस्तीत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण ७ लाख, सामदा येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम ७ लाख, डोंगरगाव येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम ५ लाख, घोडेवाही येथे बौद्ध परिसरात सामाजिक सभागृह-१० लाख, वाघोली बुटी ग्रामपंचायत संरक्षण भिंत ५ लाख, जनकापुर सामाजिक सभागृह ७ लाख यासह अनेक विकासकामे मंजूर करण्यात आले आहे..