(राजू पिसाळ) पुसेसावळी
पुसेसावळी : महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षितिजावर महिलांनी सतत समाजात व राजकारणात पुढाकार घेतला आहे .महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला म्हणूनच आज सावित्रीच्या लेकींनी शिक्षण घेवुन विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत.
यापुढील काळातही महिलांनी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रयत्नशिल रहावे,असे आवाहन वडूज तहसिलदार डॉ.अर्चना पाटील यांनी केले. म्हासुर्णे ता.खटाव येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ उषा कुलकर्णी, माणदेशी फौडेशन मँनेजर सौ.स्मिता टकले, सरपंच सचिन माने, उपसरपंच सुहास माने, देशपांडे मँडम, काळे मँडम, लावंड मँडम, डोईफोडे मँडम, ग्रामविकास अधिकारी कुंभार साहेब उपस्थित होते.
तसेच महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून रांगोळी स्पर्धा व खाद्य पदार्थ बणवने (रेसीपी) स्पर्धा आयोजित केल्या होत्या. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक अनिता डोळ,द्वितीय क्रमांक,चैताली गुरव,तृतीय क्रमांक सौ.आदिती इनामदार,उत्तेजनार्थ कु.वैष्णवी माने व कु,साक्षी चव्हाण यांना अनुक्रमे क्रमांक मिळाले,
तसेच खाद्य पदार्थ बनवने (रेसीपी) यामध्ये प्रथम क्रमांक सौ.विमल जंगम,द्वितीय क्रमांक अनिता डोळ,तृतीय क्रमांक वृषाली औंधे,उत्तेजनार्थ आयेशा महाफुले,रुपाली पवार यांनी क्रमांक मिळवले वरील सर्व बक्षिस सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
म्हासुर्णे गावातील महिला स्वयंउद्योजिका ज्या महिलांनी स्वताःच्या हिंमतीवर आपले व्यवसाय सुरू केले आहे व ते चांगल्या प्रकारे चालवत असणार्या रेखा औंधे,दिपाली सुर्यवंशी,विमल जंगम,प्रतिभा गुरव,शुभांगी कुलकर्णी,प्रियांका माने,पुष्पा माने,शैला माने,जयश्री शिंदे,आशा सरकाळे,यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या संगिता गुरव,वदंना माने,तृप्ती थोरात,सिताबाई माने,नलिनी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका अंगणवाडी सेविका व गावातील महिलांचा ग्रामपंचायतीच्या मार्फत सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,गुलाब वायदंडे, आबा यमगर,सिकंदर मुल्ला,हेमंत कुलकर्णी, विजय गुरव, लाला गुरव उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वदंना माने(जाधव) मँडम यांनी केले.तर आभार सौ.जयश्री इनामदार मँडम यांनी मानले.