Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च ०६, २०१९

परिवहन विभागाचा १३.०३ लाख शिलकीचा अर्थसंकल्प परिवहन समितीकडे सुपूर्द

kavyashilp Digital Media


नागपूरता. ६ : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने २८१.९९ कोटी उत्पन्नाचा आणि १३.०३ लाख शिलकीचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी बुधवारी (ता. ६) परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे व सदस्यांकडे सादर केला.
याप्रसंगी आयोजित बैठकीला सभापती बंटी कुकडे, पदेन सदस्य तथा स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, परिवहन समितीचे सदस्य प्रवीण भिसीकर, अर्चना पाठक, उज्ज्वला शर्मा, अभिरुची राजगिरे, मनिषा धावडे, विद्या मडावी, वैशाली रोहणकर, कल्पना कुंभलकर, नितीन साठवणे, निगम सचिव हरिश दुबे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्र. अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरुडे, लेखा अधिकारी श्री. भारद्वाज, वाहतूक अधिकारी सुकीर सोनटक्के, परिवहन अभियंता योगेश लुंगे उपस्थित होते.
सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प चे उत्पन्न २८१.८४ कोटी अपेक्षित आहेसुरुवातीची शिल्लक १४. लाख धरून एकूण अपेक्षित उत्पन्न २८१.९९ कोटी राहीलत्यातील २८१.८६ कोटी खर्च होईलअसे अपेक्षित आहे.
अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी इलेक्ट्रिकवर चालणा-या पाच मिडी तेजस्विनी बसेस, पर्यावरणपुरक धोरण राबविण्याच्या अनुषगांने मनपाच्या ५० स्टॅन्डर्ड बसेसचे परिवर्तन बायो सीएनजी मध्ये परिवर्तीत करण्याचा नागपूर महानगरपालिकेचा मानस आहे. याशिवाय प्रतिबस ऑपरेटर १५ मिनी बसेस प्रमाणे एकूण तीन डिझेल बस ऑपरेटरकडून एकूण ४२ मिनी बस शहरबस सेवेत दाखल होणार आहेत. या मिनी बसेस शहरातील लहान मार्गांवर संचालित करून मेट्रो स्टेशन व बस स्थानकापर्यंत सेवा देणार आहेत. अर्थसंकल्पात बदल करण्याचे अधिकार समिती सदस्यांनी सभापती बंटी कुकडे यांना दिले.


शहीद कुटुंबीय व दिव्यांगांना नि:शुल्क प्रवास
चालू आर्थिक वर्षात परिवहन समितीतर्फे अनेक नवीन आणि महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यात येणार आहेत. यामध्ये लष्कर, निम लष्कर दल, पोलिस दलातील देशासाठी कर्तव्यावर तैनात असताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबातील शहीदांच्या वीर माता, वीर पत्नी, व मुलांसह दिव्यांग बांधव व त्यांच्या सोबतच्या साथीदाराला नि:शुल्क प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
शहरबस व मेट्रोच्या प्रवाशांसाठी ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’
लवकरच नागपूर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत सुरू होणार आहे. त्यामुळे शहर बसेस व मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘कॉमन मोबिलिटी कार्ड’ या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शहर बस व मेट्रो रेल्वेचा सलग वापर प्रवाशांना करता येणार आहे. याशिवाय नव्याने कोराडी मंदिर जवळ २० हजार चौरस मीटर एक बस डेपो एनआयटी, एनएमआरडीए तर्फे विकसीत करण्यात येत असून सदर डेपो शहर बस सेवेत लवकरच दाखल करण्यात येणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.