चंद्रपूर/प्रतिनिधी:
शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी सन 2019 या दिनदर्शिका वर्षाकरीता चंद्रपूर जिल्हयासाठी पुढील प्रमाणे स्थानिक सुटया जाहिर केल्या आहेत. त्यामध्ये अक्षयतृतीया 7 मे 2019 (मंगळवार), धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन 16 ऑक्टोंबर 2019 (बुधवार) व धनत्रयोदशी 25 ऑक्टोंबर 2019 (शुब्रवार) रोजी हया सुटया संपूर्ण जिल्हयाला लागू राहणार आहेत. परंतु चंद्रपूर जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष (बँका) यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


