अपंगांच्या विविध समस्या विधिमंडळात मांडणार
शिक्षक आमदार नागोजी गाणार
नागपूर / अरूण कराळे:
अपंगांच्या समस्या संदर्भात विधिमंडळात आवाज उठवून अपंग कायद्याची अंमलबजावणी केली जाईल तसेच अपंगांच्या समस्या संदर्भात प्रशासनावर दबाव आणला जाईल .मी सदैव अपंगांच्या सोबत राहिल असे आश्वासन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी उदघाटन प्रसंगी केले .
नागपूर येथील झांशी राणी चौकातील मधुरम सभागृह मध्ये आयोजित अपंग कर्मचारी संघटना तर्फे विभागीय कार्यशाळेत गुरूवार २१ फेब्रुवारी रोजी शिक्षक आमदार नागो गाणार बोलत होते .
अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष साईनाथ पवार होते . प्रमुख पाहूणे म्हणून राज्य कोषाध्यक्ष विलास भोतमांगे ,राज्य उपाध्यक्ष ओंकारनाथ दाणी, उस्मानाबादचे महादेव शिंदे ,रायगडचे राकेश सावंत ,उमरगाचे पवार सर प्रामुख्याने उपस्थित होते .सर्वप्रथम पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली . राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी संघटनेच्या कामकाजावर धोरण व अपंगांच्या समस्या संदर्भात चर्चा केली .अपंग कायदा २०१६ मधील नविन तरतुदी, अपंगांच्या सेवाविषयक समस्या , अपंगांची सद्यस्थिती यावर चर्चा करण्यात आली.
प्रश्नोत्तराच्या तासात समस्या वर मार्गदर्शन करण्यात आले .प्रास्ताविकतेतून विलास भोतमांगे यांनी अपंगांच्या समस्या , मागण्या, कार्यशाळा आयोजनाची भूमिका व प्रशासनाची हतबलता या विषयावर प्रकाश टाकला .यावेळी जेष्ठ मार्गदर्शक नामदेव बलगर , रणजित जोशी ,वर्धा जिल्हाध्यक्ष संजय वाढवे ,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दयाराम भाकरे ,गोंदिया जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश बिसेन रायगड जिल्हाध्यक्ष राकेश सावंत यांनी अपंगांच्या समस्यावर प्रकाश टाकला . शेवटी वंदे मातरमनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यशाळेचे संचालन राजकुमार चोपकर व आभार प्रदर्शन बाळू वानखेडे यांनी केले . कार्यशाळेच्या आयोजनासाठी मोहन आदमने रविदास तांडेकर ,संजय मानवटकर ,शितल कुमार मेश्राम, रामराव सातपुते, मंगला पेशने, अनिता जावळकर , कुसूम नारायणे,वंदना शृंगारे,धनराज बडोले,पंकज ढोले,अभिता सिलिकर,ज्योती आस्टनकर ,बादल कापसे आदींनी सहकार्य केले .यावेळी संघटनेचे २२५ पदाधिकारी उपस्थित होते.