Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

Whats App वर 230 नवीन इमोजी येणार


व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.

Status सर्वात आधी दिसणार नव्या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप Status चं Ranking बदलणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवर आपण ऑनलाईन असताना सर्वात जास्त ज्या कॉन्टॅक्टसोबत चॅट करतो त्यांचं Status सर्वात आधी दिसणार आहे. त्यानुसार Status चा क्रम ठरवण्यात येणार आहे. तसेच Ranking ठरवताना अन्य काही गोष्टींचा देखील आवर्जून विचार केला जाणार आहे.

  1. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपण अनेकांशी गप्पा मारत असतो. मात्र यामध्ये आपण कोणत्या व्यक्तीशी अथवा ग्रुपमध्ये सर्वात जास्त संवाद साधतो हे आता समजणे अधिक सोपे होणार आहे. 
  2. - आपल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा. 
  3. - व्हॉट्सअ‍ॅप ओपन केल्यानंतर डिस्प्लेवर सर्वात वर तीन डॉट दिसतात त्यावर क्लिक करा. 
  4. - आयफोनचा वापर करत असाल तर होम पेजवर खाली दिलेल्या सेटींग पर्यायावर डबल टॅप करून सेटींगमध्ये जा. 
  5. - सेटींगमध्ये जाऊन डेटा अँड स्टोरेज यूजेस या पर्यायावर क्लिक करा.
  6. - चॅट आणि डेटा यूजेसवर आधारित ग्रुप्स आणि कॉन्टॅक्सची एक लिस्ट मिळेल. त्यामध्ये सर्वाधिक चॅट केलेल्या व्यक्तीची माहिती मिळेल.
  7. - व्हॉट्सअ‍ॅपवर आपण सर्वाधिक गोष्टी शेअर केलेल्या एखाद्या व्यक्तीविषयी अथवा ग्रुपविषयी येथे माहिती मिळते. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.