नागपूर / अरूण कराळे
नागपूर तालुक्यातील दवलामेटी जवळील आठवा मैल पावर हाऊस परिसरात रविवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान कार चालकाने मोटरसायकल एम एच ४० बीक्यू ००१५ यावरील मोटार सायकल स्वार कार मध्ये आल्याने एक जागीच ठार तर गंभीर जखमी झाला.
पोलीस सूत्राच्या माहीतीनूसार मोटर सायकल स्वार मृतक अमित माटे वय २८ रा . वानाडोंगरी हा भाचा सुरेश अशोक पाटील वय २५ रा .दवलामेटी याला सोबत घेऊन नागपूर वरून घराकडे जात असताना एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटर सायकल चालकाचे संतुलन बिघडल्याने ते स्विफ्ट कार क्रमांक एम एच ३१ -एफ सी २२०७ मध्ये घुसल्याने मोटरसायकल चालक अमित माटे याचा जागीच मृत्यू झाला तर सुरेश पाटील हा गंभीर जखमी झाला.पोलीसांना घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवकरण डोंगरे ,हवालदार शेषराव येलेकर,नितीन करडभाजने,संजय पांडे आदी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.कार चालक घटनास्थकरून गाडी सोडून फरार झाला.वाडी पोलिस पुढील तपास करीत आहे.