Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

वाडीत जलशुद्धीकरण यंत्रातून निघणारे पाणी रस्त्यावर

शहरात भीषण पाणी टंचाई, आरो वाटर बंदमुळे नागरिकांची भटकंती

वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे
वाडी शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वाडी नगर परीषद प्रशासनाने शहराच्या वेगवेगळ्या भागात आजपावेतो सात जलशुद्धीकरण यंत्र लावून शुद्धपाणी पूरवठा करण्याचे केविलवाणा आटोकाट प्रयत्न केला असला तरी प्रशासनाच्या नियोजनाअभावी बऱ्याच वेळा यंत्र विविध कारणांमुळे बंद असल्याने स्थानिकांना शुद्ध पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे तर कधी रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे .जलशुद्धीकरनातून निघणाऱ्या अशुद्ध पाण्याचे नियोजन इतरत्र चांगल्या कार्यासाठी नगर परिषदेने न केल्याने पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे विदारक चित्र वाडीत निर्माण झाले आहे.
संपूर्ण वाडी शहराला मागील कित्येक वर्षांपासून वेणा जलाशयातुन पाणी पुरवठा केला जातो,परंतु मागील वर्षी कमी पावसामुळे जलाशयात आवश्यक तेवढा पाण्याचा
साठा न झाल्यामुळे दोन महिन्यांपासून शहरातील पाणी पुरवठयात पाणी कपात करीत आठवड्यातून एकदा तर काही भागात पाणी पुरवठाच बंद करण्यात आला आहे .गेल्या कित्येक महिन्यापासून टंचाईग्रस्त भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.पाण्याचा अपव्यय कसा टाळावा पाण्याची बचत कशी करावी याबाबत स्थानिक प्रशासन ध्वनिप्रक्षेपणाद्वारे माहिती देत जनजागृती करीत आहे.परंतु जवळपास साडे सहा लाख रुपये एका जलशुद्धीकरण संयंत्रावर खर्च करून स्थानिकांना शुद्ध पाणी पुरवठा करीत असल्याचा टेंभा मिळविणाऱ्या नगर प्रशासनाने संयंत्रातून निघणाऱ्या अशुद्ध पाण्याच्या संदर्भात योग्य नियोजन न केल्याने पाणी रस्त्यावर वाहत आहे.अशा भीषण पाणी टंचाईत जलशुद्धीकरण यंत्रातून निघणारे हजारो लिटर अशुद्ध पाण्याचा उपयोग शहरातील झाडे वाचविण्यासाठी करता आला असता याच साधी कल्पना प्रशासनाला आली नाही.अशुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी टाकलेली प्लास्टिक पाईपलाईन तुटल्याने सर्वत्र पाणी वाहत असताना प्रशासनाच्या लक्षात न येणे ही धक्कादायक बाब आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.