Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी १८, २०१९

जनसामान्याचे जिवन समृद्ध करणारे हे सरकार - शेखर चरेगांवकर



मायणीःता.खटाव जि.सातारा
केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हे सामन्य माणसाच्या हिताचे सरकार व जिवन समृद्धाकरणारे सरकार असुन या सरकारने जनसामान्यांना शैचालय योजना व जनसामान्यांना ५कोटी महिलांना मोफत गँस योजना व विविध योजना जे माघील सरकारने जे ५५वर्षात केले नाही ते भाजप सरकारने ५५महिन्यात कामे केली .मायणी व खटाव माण परीसरातील अपुर्ण कामे पुर्ण केल्यानंतर च मी लोकसभा व विधानसभेला मत मागायला तुमच्या दारात येईन असे स्पष्टपणे मत महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष ना.शेखर चरेगांवकर यांनी मायणी येथील फुलेनगर परिसरातील फुलेनगर ते स्मशानभूमी चांद नदी साकव पुलाच्या भुमी पुजन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार डॉ दिलीप राव येळगावकर कर्तव्यदक्ष युवानेते सचिन गुदगे यांची प्रमुख उपस्थिती होती

महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधारित येजनेतुन फुलेनगर ते स्मशानभूमी साकव पुल मंजूर झाला असुन याचा खर्च२६लाख मंजुर झाला आहे. प्रास्ताविक तानाजी वायदंडे यांनी सांगितले की या नवीन ग्रामपंचायत ने विकास कामे सुरू केली आहे असुन जाहीर केलेल्या वचनाम्याप्रमाने डॉ दिलीपराव येळगावकरांच्या प्रयत्नातून सकव पुल मंजुर केला याबद्दल सचिन गुदगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन करतो तसेच सर्व दलित समाज यांना भुखंड मिळवून या समाजाला पंतप्रधान योजनेतून अधिक घरकुल मीळावी अशी मागणी केली

यावेळी बोलताना युवानेते सचिन गुदगे म्हणाले जि.प.निवडणुकीत२००मतानी अपयश आले परंतु चांगल्यामतानी ग्रामपंचायतीवर आपण सत्ता मिळवली या सतेच्या माध्यमातून२०कोटी रुपयांची तरतूद करुन विकास कामे पुर्णतः कडे आहे ग्रामविकास येजनेतुन मा.पंकजा ताई मुंडे यांच्या मुळे पंचायतील विकास साठी १कोटी२५लाखचा निधी मिळवलाआहे आम्ही विकासासाठी स्पर्धा करतो असे सांगितले

डॉ दिलीपराव येळगावकर म्हणाले जाहीरनाम्याप्रमाने आम्ही शब्द पुर्ण केला आहे टेंभू चे पाणी एका महिन्यात तलावात येत आहे सध्याचँनेल गेटचे काम सुरू आहे गावाच्या विकासासाठी आम्ही खंबीर पणे पुर्ण करु असी ग्वाही दिली

या कार्यक्रमात उप सरपंच आँ. सुरज पाटील, ग्रामपंचायत सदस्य जग्नाथ भिसे,आनंदा शेवाळे, विजय कवडे,सौ.मंदारा पाटोळे, बंडा माळी,अप्पासाहेब भिसे,गणेश भिसे,दिनकर कांबळे, सुदाम भिसे,संजय साठे,सुरेश कुंभार, नंदकुमार कांबळे, तुकाराम पाटोळे, जेष्ठ बबनराव घोलप,किशोर खिलारे,भाजप युवा कार्यकर्ते आंकुशराव भिसे व मित्रपरिवार, भाजपाचे मायणी शहर आध्यक्ष जालिंदर माळी,धोंडीराम दगडे,भाजपा युवा मोर्चा माण तालुका आध्यक्ष ब्रमदेव काटकर,युवा आध्यक्ष अरुण सकटे,योगेश गायकवाड,गोंदवले भाजपा आध्यक्ष अरुण कट्टे तसेच परिसरातील बहुजन समाज बांधव उपस्थित होते आभार प्रदर्शन युवा कार्यकर्ते गणेशजी भिसे यांनी समस्त उपस्थित बांधवांचे समाजाचेच आभार मानले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.