प्रकाराविषयी मुख्यमंञ्यांनी लक्ष घालावे : दत्ताञय फडतरे
प्रतिनिधि (पुणे )
माजी सैनिक वसतिगृह पर्वती ,पुणे येथे शिवीगाळ धमक्या ,निकृष्ट अन्न, खोट्या सह्या ,साहेबांना फळे द्यावी लागतात ह्या प्रकरणात चौकशी करुन गुन्हे दाखल करुन अपहार केलेली रक्कम वसुल करण्याची मागणी दत्ताञय फडतरे यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे
देशासाठी पंधरा- वीस वर्षै देशसेवा करणार्या माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी तसेच अनाथ, विधवा मुलांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सैनिक कल्याण विभागामार्फत सोय केली जाते परंतु पुणे सैनिक कल्याण विभागामार्फत पुणे शहरातील पर्वती येथील माजी सैनिक मुलांच्या वसतिगृहाच्या प्रशासनाचा अजब कारभार सुरु आहे .चार वर्षोपासुन मुलांना विविध ञासाला सामोरे जावे लागत आहे .मुलांची शैक्षणिक वर्षोत अडथळा येत आहे ,प्रशासनाची दहशत असल्यामुळे बहुतेक विद्यार्थी तक्रार करण्यास पुढे येत नाही तक्रार करण्यास पुढे आल्यास ,त्यांवर दादागिरी व संपवुन टाकण्याची भाषा केली जाते .यामुळे मुलांना निकृष्ट अन्न, खोट्या सह्या ,स्वयपाकघरात झुरळे, शौचालयाची साफसफाई नियमित होत नाही हे प्रकार समोर येत आहेत ह्या बाबी चौकशी अहवालात समोर आल्या आहेत यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पाठीमागच्या काही वर्षोत सैनिक कल्याण आधिकारी, वसतिगृह अधिक्षक साळुंखे हे ऐकमेंकांवर आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत ,सैनिक कल्याण विभागाचे धनादेश वटले जात नाहीत , शासकीय नियमानुसार जेवण मिळत नाही .मुलांची अन्नासाठी अबाळ होत आहे.
सबंधित प्रकरणाला सैनिक कल्याण विभागातील वरिष्ठांचे पाठबळ असल्याची शंका मुलांमधुन उपस्थित केली जात आहे.
ध्वजदिन निधीमधुन संकलित होणार्या पैशांचा अपहार करणार्या , देशासाठी देशसेवा करणार्या माजी सैनिकांच्या पाल्यांना जाणीवपुर्वक ञास देणार्या प्रकरणाची निपक्ष :पणे चौकशी करावी ,दोषी आढळणार्या आणि कर्तव्यात कसुर करणार्या आधिकार्यांसह ,अधिक्षकावर कायदेशीर कारवाई करुन अपहार केलेली रक्कम वसुल करण्याची मागणी मुख्यमंञ्यांना पाठवलेल्या पञात फडतरे यांनी केली आहे.