Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी २४, २०१९

अकोले पट्टाकिल्ल्याच्या कामासाठी भरीव निधीची तरतुद

विष्णू तळपाडे/खबरबात प्रतिनिधी/अकोले(अहमदनगर)

अकोले-सरकारच्या उदासीन धोरणामुळे पट्टाकिल्ला येथील कामांसाठी निधी न मिळाल्यामुळे काही काम ठप्प झाले होते.मात्र या बाबत अधिवेशनात आवाज उठवून सतत पाठपुरावा केल्यामुळे १कोटी ४७लाखांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीने पर्यटन विकासाला चालना मिळेल व पट्टाकिल्याचे सुशोभिकरण करण्यात येईल तसेच पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारुन चांगले स्मारक तयार करु असा विश्वास आ.वैभवराव पिचड यांनी व्यक्त केला.

         अकोले तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राहिलेल्या पट्टाकिल्ला (विश्रामगड)येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवयात्रा कार्यक्रम प्रसंगी आ.पिचड बोलत होते.या वेळी मा.आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड,जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम गायकर,हेमलताताई पिचड,मिनानाथ पांडे,विक्रम नवले आदि उपस्थित होते.पुढे बोलताना आ.पिचड म्हणाले की,शिवाजी महाराजांनी स्वाभिमान व आत्मबलिदान शिकविले.सर्व जाती धर्माना बरोबर घेऊन जाणारे,स्वतःचे राज्य निर्माण करणारे जगातील एकमेव राजे छत्रपती होते.

                   यावेळी माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड म्हणाले की,कष्टकर्यानसाठी,शेतकऱ्यासाठी,गोरगरीब जनतेसाठी शिवाजी महाराजांनी काम केले;म्हणूनच ते लोककल्याणकारी राजे होते.त्यामुळेच अखंड महाराष्ट्र घडला.अशा प्रकारची भावना व्यक्त करुन त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभामंडप साठी ७० लाख रुपये राखुन ठेवल्याची कबुली आयोजित कार्यक्रमात दिली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.