Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १५, २०१९

गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व निरोप समारंभ

पवनी / प्रतिनिधी

स्थानिक वैनगंगा विद्यालय पवनी येथे गुरुवार १४ फेब्रुवारी रोजी सत्र २०१७-१८ या काळातील वर्ग दहावा; वर्ग बारावी कला व विज्ञान शाखेतील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व सत्र २०१८-१९ मधील वर्ग 10 व वर्ग १२ च्या  विद्यार्थ्यांना निरोप समारंभ पार पडला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर धुर्वे हे पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर व्यासपीठावर वैनगंगा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उषा चउत्रे , वैनगंगा पब्लिक स्कूलच्या लीना कोरेकर, ज्येष्ठ शिक्षक पराग टेंभेकर , महादेव     तेलमासरे , सुनील कावळे , प्रोफेसर अाकरे व पालक प्रतिनिधी गौतम मंडपे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील संगीत शिक्षक शशांक आठले , विशाल निनावे व चमूने स्वागत गीत गायन केले . याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले . विद्यालयातील शिक्षकांच्या वतीने व काही माजी शिक्षकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात यात रोख रक्कम व प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना शील्ड देऊन गौरवण्यात आले.विद्यालयातील विद्यार्थी गुरुदेव वाडीभस्मे ; रुचिता भाजीपाले , रोहित पराते इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले . कार्यक्रमाचे संचालन वैनगंगा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका भारती माळवी यांनी केले,भा तर आभार शिक्षक प्रमोद मुंडले यांनी केले


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.