Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १५, २०१९

पॉवर गर्ल करुणा दहीवले राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम

 नागपूर/प्रतिनिधी:

43 व्या अखिल भारतीय विद्युत क्रिडा नियंत्रण मंडळद्वारा एरोड, तामिळनाडू येथे आयोजित महिला बॅडमिंटन स्पर्धेत खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र येथे कार्यरत करुणा अनिल दहीवले हिने अंतिम सामन्यात छत्तीसगडच्या अनिता सिंग चा पराभव केला. पहिला सेट 12-15 ने गमावल्या नंतर करूणाने दुसरा सेट 15-10 व तिसरा सेट 15-12 ने जिंकत महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकविले.

करुणा दहिवलेने प्राथमिक फेरीत बिहार संघाविरुद्ध 15-10,15-10 ने सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात तामिळनाडू संघाला 15-8, 15-6 हरविले.उपांत्य पूर्व फेरीत तेलंगणा जेनको 15-11,15-13 हरविले. उपांत्य सामन्यात मध्यप्रदेशला 15-12,16-14 ने हरवून थेट अंतिम फेरी गाठली.

करुणाच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र येथे श्री. राजेश पाटील, मुख्य अभियंता, यांच्या शुभहस्ते करुणाचा भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्री.राजेंद्र राऊत, उपमुख्य अभियंता, श्री.मनोहर खांडेकर, उपमुख्य अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.

माझ्या जडणघडणीत महानिर्मितीचे मोठे योगदान आहे. मला खेळण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा दिल्या, अधिकारी-कर्मचारी यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले, प्रशिक्षकांनी माझ्या खेळातील तांत्रिक बाजू भक्कम केल्याने हे यश संपादन करणे सुकर झाल्याचे करुणाने सांगितले. 

राजेश पाटील म्हणाले की, "करुणा हिने अल्प कालावधीमध्ये उत्तम सराव,खडतर मेहनत, व्यावसायिक प्रशिक्षकाचे बहुमूल्य मार्गदर्शन यातून अभूतपूर्व यश मिळवून खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा व पर्यायाने महानिर्मितीचा नावलौकिक देशपातळीवर वाढविला असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

महानिर्मितीचे वरिष्ठ व्यवस्थापनाने करुणाचे विशेष अभिनंदन केले आहे. राज्यभरातून करूणावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कार्यक्रमास सर्वश्री अधीक्षक अभियंता, सर्व विभागप्रमूख, अभियंते, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार श्रीमती अनघा चिरडे, कनिष्ठ अभियंता यांनी केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.