पवनी : घरी एकट्या असलेल्या विवाहितेचा खून झाल्याची घटना पवनी येथील बेलघाटा वाॅडाॅत मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आले.
या खुनाचे गूढ कायम असले तरी विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ज्योत्स्ना गणेश जुमळे (३०) रा ,पवनी असे मृत महिलेचे नाव आहे.
मंगळवारी रात्री ८.३०वाजताच्या सुमारास पती गणेश रामदास जुमळे आपल्या घरी परत गेला तेव्हा पत्नी मृतावस्थेत आढळून आली, तिचा खून झाल्याचे लक्षात आले, रात्रीच पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले ,दरम्यान बुधवारी ज्योत्स्नाचा भाऊ गोकुळदास काटेखाये (४३) रा, खातखेडा यांनी या प्रकरणी संशय व्यक्त करीत तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी पती गणेश रामदास जुमळे (३५), उमेश रामदास जुमळे (३०),मंगेश रामदास जुमळे (२८).चिंधाबाई रामदास जुमळे (५५) आणि रामदास जुमळे (६०). यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
द रम्यान खुनाचे गूढ कायम असून नेमका खून कशासाठी झाला याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक आणि फिंगर पिंन्ट तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. |