Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १५, २०१९

जम्मू काश्मीर पुलवामा आतंकवादी हल्ल्यात नागपूरचा जवान शहीद

नागपूर/प्रतिनिधी:

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात नागपुरातील एक जवान शहीद झाले आहेत. संजय राजपूत असे या जवानाचे नाव असून  ते नागपूर येथील हिंगणा परिसरातील CRPF च्या  वसाहतीत राहत होते.

मुळचे मलकापूरचे असलेले शहीद जवान संजय राजपूत हे त्यांच्या जय (वय 12) व शुभम (वय 8) व पत्नी सुषमा सोबत नागपूर येथील हिंगणा परिसरातील CRPF च्या वसाहतीत राहत होते.शहीद जवान संजय भिकमसिंग राजपूत यांनी 1996 मध्ये सीआरपीएफमध्ये रूजु झाले. पहिली पोस्टिंग त्रिपुरा येथे झाली. 11 वर्षाची देशसेवा केल्यानंतर पुन्हा 5 वर्षे सेवा वाढवून घेतल्यानंतर काल (ता. 14) जम्मू काश्मीर मध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले.संजय हे १५५ बटालीअन मध्ये कार्यरत होते. या भ्याड हल्ल्याचे वृत्त नागपूर अन बुलढाण्यात पोहचताच सर्वत्र शोककळा पसरली .

विशेष म्हणजे सुरत येथील संजयचा भाचा पियुष बयस यांच्यासोबत संजयचे दु 1:30 वाजता जम्मूवरून श्रीनगरकडे जाताना भ्रमणध्वनी वर बोलणे झाले होते. हा संजयचा शेवटचाच कॉल ठरला. मुलाला वीरमरण प्राप्त झाल्याने म्हाताऱ्या आईवर सध्या डोंगर कोसळला आहे.

10 फेब्रुवारीला संजय राजपूत मलकापूरवरून आईची व मित्रांची भेट घेऊन नागपूरमार्गे 4-5 दिवसाच्या सुट्या संपवून जम्मूकडे रवाना झाला होता. त्यांची ही शेवटचीच भेट ठरली.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.