विष्णू तळपाडे/अकोले(अहमदनगर):
१० फेबु़वारी रविवार आदिवासी रत्न राष्ट्रपती पुरस्कार विजेते ठक्का बाबा गांगड यांचे आज सकाळी८:३०वाजता दुःखद निधन झाले.कामडावणा नृत्याला दिल्ली पर्यत नेऊन मोठ-मोठ्यांना आश्चर्यचकित करुन आदिवासीच्या शिरपेचात आपल्या आवाजाचा मानाचा तुरा रोवणारे व आपल्या कलेतुन विविध पशु-पक्षाचा आवाज काढणारा आदिवासी मोगली यांचेवर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
वयाची अनेक दशके त्यांनी लोकरंजन केले..जवळपास ८५वर्षे वयोमान असलेला हा उत्साही व्यक्ती वाघ,सिह,कोल्हा,कुञा,मांजर,बैल,पोपट,कावळा,कोकिळा,बकरी याबरोबरच अनेक प्राण्यांचे आवाज पाहण्याची संधीच बाबांच्या रुपाने अकोले तालुक्याला लाभली होती.
स्वतः ला महान समजणारे अनेक कलाकार पाहिले,पैशासाठी कलाविकणारे ही पाहिले कलेच्या नावाखाली बाजार मांडणारे ही पाहिले.स्वतःच्या कोशात हरवलेले अनेक जण नजरेस पडले.पण कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांसाठी वाहुन घेतलेला आमचा हा बाबा आमच्या दृष्टीने ठकाबाबा खरच शांत ..कारण तो कलेनेच नव्हे तर,माणुसकीनेही खुपच मोठा आहे.कलेसाठी सर्वस्व अर्पण करणारा हा अवलिया पाहिला की डोळ्यातून पाणी येते.आपल्या वेदना आपल्याच असतात.त्या जगाला दाखविण्यासाठी नसतात.
हे माणुन जगाच्या मनोरंजनासाठी सज्ज असलेला हा मोठा माणुस दुःख चेहऱ्यावर जाणवू न देता.आपल्या कलेतुन निखळ आनंद देणारा हा महान आत्मा अनेक सत्कारांचा पुरस्कार्थी पण घराची झोळी सतत रिकामीच आपल्या आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी ही कलाआदिवासी भागातील नागरिकांनसाठी सादर केली होती.त्यातुन त्यांना कधी पैसे मिळाले नाहीत.पण हा अवलिया कलेशी प्रामाणिक राहिला.कलेद्वारे अनेक पिढ्याचे मनोरंजन करत राहिला.आपल्या आवाजाची जादु प्रेक्षकांना दाखवत राहिला.कोणी काय दिले माहिती नाही.पण त्यांनी प्रेक्षकांना भरभरुन मनोरंजन मात्र दिले.अडथळ्याना हसत-हसत सामोरे जाणारा पैशासाठी नव्हेतर माणसासाठी कला सादर करणारा महान कलावंत,कलाकाराला भावपुर्ण श्रध्दाजली.