Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ११, २०१९

र.म.नि.सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष हकीम हुसैन यांचा सत्कार

चंद्रपूर/प्रतिनिधी:

आस्था बहूद्देशिय चैरिटेबल ट्रस्ट , वरोरा तर्फे दिनांक 10 फेब्रुवारी रोज रविवार ला गौरव सेलिब्रेशन येथे 21 दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले.

या वेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी पालकमंत्री अनीस अहमद,माजी आमदार गेव आव्हारी,श्री.शामबाबूजी पुगलिया सामाजिक कार्यकर्ता चंद्रपूर,सौ. नगिना पुगलिया चंद्रपूर,राहुल पुगलिया,समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर,नीलम राचलवार,सुभाष शिंदे तसेच अन्य मान्यवारांची उपस्थिती होती.

रक्तदान क्षेत्रात हकीम हुसैन यांनी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक रुग्णांना रात्री, मध्यरात्री गोर गरीब रुगांची सेवा केली. आणि संस्थेचे अध्यक्ष म्हणून आजही कार्यरत आहे.यांच्या कार्याची दखल घेत आस्था बहुद्देशीय चैरिटेबल ट्रस्ट तर्फे शाल व स्मृतीचिन्ह देऊन माजी मंत्री अनीस अहमद यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला.

  या वेळी अन्य मान्यवरासोबत रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाउंडेशन चे सर्व सदस्य उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.