Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, फेब्रुवारी ११, २०१९

सोने पाॅलिश करण्याच्या बहाण्याने ६ तोळे सोन लंपास

पुसेसावळी :(राजु पिसाळ)

खटाव तालुक्यातील जयराम स्वामीचे वडगाव येथील  माजी सैनिक अशोक रामराव घार्गे यांच्या पत्नीकडुन  राहत्या घरातुन सोने पालिश करून देण्याचं आमिष दाखवून साडेपाच तोळेचा सुवर्ण अलंकार लंपास केला. 

याबाबत अधिक माहिती अशी की दुपारच्या वेळेत दोन अनोळखी इसम त्यांच्या घराजवळ आले त्यांनी आम्ही सोने चांदीचे पाॅलिश करतो तुमचे करायचे असेल दया आम्ही बिना मोबदला पाॅलिश करुन देतो. 

या अमिशाला बळी पडुन अशोल घार्गे यांच्या पत्नीने आपल्या जवळील साडेपाच तोळयाचा सुवर्ण अलंकार दिला. आणि त्या इसमांनी तो त्यांना पाॅलिश केला आहे असे सांगुन त्या भांडयातुन अर्धा तास बाहेर काढु नका असे सांगुन ते इसम तेथुन लंपास झाले 

त्यानंतर अापली फसवणुक झालेचे लक्षात आलेवर त्यांनी अाैंध पोलिसला झालेली घटना सांगितली त्याचप्रमाणे अनोळखी इसमावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .तरी या गुन्हयाचा तपास पोलीस निरिक्षक विलास कुबले करित आहेत.

अोैंध पोलीस अंतर्गत येणार्‍या गावामध्ये अनोळखी व्यक्ती दिसल्यास पोलीस स्टेशनची संपर्क साधावा तसेच अशा प्रकाराच्या घटना हातचलाकीने केल्या जातात तरी अशा व्यक्तिंना बळी पडु नये असे आवाहन केले.

सहाय्यक पोलिस निरिक्षक 

श्री.सुनिल जाधव 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.