उमेश तिवारी/कारंजा(घाडगे) वर्धा:
कारंजा येथील वनविभागाने विहिरीत पडलेल्या पाच वर्षाच्या निलगाईला जीवदान दिले. रघुनाथ नाचरे यांच्या शेतात 5 वर्षाची नीलगाय शेतातील विहिरीत पडली. विहिरीतून पडलेल्या नीलगाईचा आवाज येत असल्यामुळे ठोंबरे हे वीर जवळ गेले असता त्यांना विहिरीत पाण्यावर निलगाय असल्याचे दिसले. शेजारी शेतकरी ठोंबरे यांना दिसले त्याने तात्काळ रघुनाथ महादेव नासरे यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. लगेचच वनविभागाचा चमू सकाळी नऊ वाजता शेतात घटनास्थळी दाखल झाला व बचावकार्य सुरुवात झाले

