चंद्रपूर/ प्रतिनिधी:
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 विचारात घेऊन चंद्रपूर जिल्हयांतील राजूरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपूरी, चिमूर व वरोरा या सहा विधानसभा मतदार संघातील मतदार म्हणून नोंदणी नसलेल्या अशा नागरिकांना मतदार नोंदणीसाठी पुन्हा संधी उपलब्ध व्हावी, म्हणून शनिवार व रविवार या सुटट्यांच्या दिवशी (VVIP) या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
सदर मतदार नोंदणी मोहिमेचा विशेष कार्यक्रम 23 व 24 फेब्रुवारी 2019 रोजी जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे उपस्थित राहून नागरिकांकडून मतदार यादीत नांव समाविष्ट करून घेण्यासंबंधी अर्ज स्विकारणार आहेत.
ज्या मतदारांना 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत. परंतु मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात आलेली नाही. तसेच दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली अंतिम मतदार यादीचे अवलोकन करण्यात यावे. ज्या पात्र मतदारांची नावे सदर मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत. अशा पात्र व्यक्तींनी त्यांच्या नजिकच्या मतदान केंद्रावर जाऊन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे नमूना 6 मध्ये अर्ज भरुन देण्यात यावे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2019 या सुट्टीच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदाराची नांवे मतदार यादीत समाविष्ट नाहीत अश्या नागरिकांकडून नांव नोंदणीसाठी नमूना 6 मध्ये अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
सदर सर्व संबंधितांना केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे मतदार यादीत नांव नोंदणी करीता नमूना 6 मध्ये अर्ज सादर करुन आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे. नागरीकांनी या विशेष मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.