नागपूर/प्रतीनिधी:
महाराष्ट्र राज्य विदुयत वितरण कंपनीच्या नागपूर शहर मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंतापदी दिलीप दोडके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपल्या पदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली.
मूळचे नागपूरकर असलेले दोडके नागपूर शहर मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी रुजू होण्यापूर्वी दोडके मुंबई मुख्यालयात बिलिंग विभागात कार्यरत होते. नागपूरच्या व्हीएनआईटी मधून विदुयत अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतल्यावर दोडके हे तत्कलीन मराविम मध्य चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे कनिष्ट अभियंता पदी रुजू झाले होते. त्यांनी कोराडी येथे ४००० कि. व्हो. येथे सुमारे अडीच वर्षे काम केले. भांडुप नागरी परिमंडलात कार्यकारी अभियंता (प्रशासन) म्हणून त्यानी साडेपाच वर्ष काम केले आहे. अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी अकोला मंडल कार्यालयात काम केले आहे.