प्रशासनाविरोधात नागरिकांत रोष,
१३ विविध मागण्याचे निवेदन,पोलीसांचा तगडा बंदोबस्त
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे:
वाडी नगर परिषद प्रशासनाच्या निष्काळजी धोरणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न न सुटल्याने लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे यांच्या नेतृत्वात तर माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी कॉग्रेसचे गटनेता राजेश जयस्वाल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक श्याम मंडपे, नगरसेवीका डॉ.सारिका दोरखंडे,रेखा लिचडे, शहर अध्यक्ष राजेश जिरापूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाडी नगर परिषद कार्यालयावर धडक देऊन शासन व स्थानिक प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाडीतील प्रत्येक वार्डात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून वेणा जलाशयात फक्त ६ टक्केच पाणी शिल्लक आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसात नागरीकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे .डॉ .आंबेडकर नगरमधील पट्टयाचा प्रलंबीत प्रश्न सोडविणे,गडर लाइन समस्या,अंतिम संस्कारसाठी स्मशानभूमित मोफत जळावू लाकूड ,ट्रान्सपोर्ट क्षेत्रात शौचालय, शहरात पोस्टऑफीसची व्यवस्था,राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे ,स्वतंत्र भाजीबाजार व मटन मार्केट,ग्रामीण रुग्णालय,वनराईच्या जागेवर मुख्य बसस्थानक,अग्नीशामक वाहन अशा एकुण १३ मागण्याचे निवेदन नगराध्यक्ष प्रेम झाडे व मुख्याधिकारी राजेश भगत यांना दिले. यावेळी राजू राऊत,सूनंदा ठाकरे, सुरेखा रीनके,रोशन हिरणवार,दत्ता वानखेडे, विजय नंदागवळी,राजू खोब्रागडे,सचिन मानवटकर,ईश्वर चव्हान, सुनील सेलोकर,शंकर कुहीटे,दिलीप दोरखंडे,प्रवीण लिचडे,योगेश चरडे,दिनेश उईके,मोहन ठाकरे,भारत फेंडर,अमित हूसनापूरे,अशोक पैदलवार,कूष्णा चरडे,नरेश राऊत, सुशील शर्मा,दिलीप चौधरी, साजन पाटील,आशिष गोरखेडे,डॉ .भालेलवार आदीसह शेकडों कार्यकर्ते उपस्थित होते .